ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मराठवाड्यात अवकाळी पाऊस; वीज पडून दोघांचा मृत्यू

औरंगाबाद, दि. ७ (प्रतिनिधी) - कडक उन्हाच्या काहिलीनंतर निसर्गाने पुन्हा मराठवाड्यावर अवकाळीचा मारा केला. अर्ध्या मराठवाड्यात गारांचा पाऊस पडला. उमरगा, अंबाजोगाई, पूर्णा, पालम, चाकूर व निलंगा तालुक्यांत गारा पडल्या. दरम्यान, वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. 

राजाबाई बबन जाधव (५८, समुद्राळ, ता उगरगा) व अशोक नरहरी दौंड (५३, घाटनांदूर, ता. अंबाजोगाई) अशी मृतांची नावे आहेत.

परभणी जिल्ह्याच्या बहुतांश भागांत काल दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. पूर्णा व पालम तालुक्यात मात्र वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गुरुवारपासून (दि.पाच) जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. दोन दिवसांत ढगाळ वातावरण राहू लागले आहे. शुक्रवारी उन्हाची तीव्रता असताना दुपारी अचानक ढगाळ वातावरण येऊन पावसाने दहा मिनिटे हलक्या स्वरुपात हजेरी लावली. मात्र, या दरम्यान प्रचंड वारे वावधान सुटले. परभणी शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. या वेळी खंडित झालेला वीजपुरवठा दोन तास सुरळीत होऊ शकला नाही. पूर्णा व पालम तालुक्यात मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली. या दोन्ही तालुक्यांत काही गावांत गारांचा खच पडला. त्यानंतर सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. वारे वावधानाने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

कन्नड तालुक्यात गारा तर वैजापूर तालुक्यात पाऊस : कन्नड तालुक्यातील नागापूर परिसरात शुक्रवारी गारांसह सुमारे अर्धा तास पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द परिसरात सायंकाळी १ तास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे उन्हाळी कामांत गुंतलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

चाकूरला येथे तासभर वादळी पाऊस झाला. पंधरा मिनिटे पडलेल्या गारांमुळे परिसरातील आब्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबही कोसळले. यामुळे तालुक्यातील अनेक गावचा वीजपुरवठा खंडित झाला होता. असाच पाऊस झरी, बोथी, चापोली, जानवळ येथे झाला. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे दुपारी अडीचच्या सुमारास अर्धा तास वादळी पावसाने थैमान घातले. गारपीटही झाली. झाडे उन्मळून पडली. किनगावलाही पावसाने अर्धा तास झोडपले.

उमरगा, लोहारा तालुक्यात काल दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उमरग्या गारांचा पाऊस झाला. वीज पडून महिला, दोन बैल, दोन वगारींचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे.