ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दुष्काळात प्रशासनाने शेतकर्‍यांच्या वेदना समजून घेऊन काम करावे - बबनराव लोणीकर

खांबेगाव येथे साधला नागरिकांशी संवाद
नांदेड, दि. 20 (प्रतिनिधी)-  दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, मागेल त्याला काम, पिण्याचे पाणी, जनावरांसाठीचा चारा प्रशासकीय यंत्रणेने प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावा. शेतकर्‍यांच्या वेदना समजून घेवून प्रशासनाने काम करावे, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी टंचाई परिस्थिती पाहणी दौर्‍यात खांबेगाव येथे दिले. खांबेगाव येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. 
लोहा तालुक्यातील खांबेगाव येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला सरळीकरण कामांची लोणीकर यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले. पावसाच्या पाण्यामुळे नदी-नाल्यांच्या खोलीकरणामुळे काठावरील माती पुन्हा नाल्यात जावू नये म्हणून नाल्याच्या काठावर बांबू किंवा अन्य गवताची लागवड करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, पंचायत समितीचे उपसभापती रोहीत पाटील, सरपंच संदीप पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील, तहसिलदार एन. जी. झंपलवाड, तालुका कृषि अधिकारी मंगनाळे यांच्यासह राम पाटील रातोळीकर, मुक्तेश्वर धोंडगे, देविदास राठोड आदींची उपस्थिती होती. 
याप्रसंगी बोलताना लोणीकर म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून पाऊस नसल्यामुळे यावर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. अशा परिस्थितीत कामे करण्यासाठी विविध शासन निर्णय शिथील करुन गावांना पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला आहे. गावकर्‍यांच्या मागणी नुसार रोहयोअंतर्गत नाला बांधबंदीस्ती, गांडूळ खत यासारखी विविध 17 प्रकारची कामे तात्काळ सुरु केली पाहिजे. जलयुक्त शिवार अभियान या महत्वाकांक्षी योजनेतून अधिकाधिक जलसंधारणाचे कामे घेऊन मजुरांना कामे उपलब्ध करुन द्यावे, त्यांचे स्थलांतर रोखावे, असे सांगून दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या वेदना समजून प्रशासनाने अधीक गतीने कामे करावेत. या कामात कुचराई करणार्‍या अधिकार्‍यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही लोणीकर यांनी यावेळी दिला. 
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विविध कारणाने बंद असणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे व अन्य कामे तात्काळ सुरु करण्यात यावीत, असे लोणीकर यांनी सांगितले. यावेळी लोणीकर यांच्या हस्ते कृषि विभागाच्यावतीने तयार केलेल्या तूर रोप लागवड तंत्रज्ञान घडीपत्रिकेचे प्रकाशन व जलयुक्त शिवार अभियानाच्या जलजागृतीसाठीच्या जलरथाला मार्गस्थ करण्यात आले.  लोहा तालुक्यातील आंबेसांगवी येथील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या नाला सरळीकरण कामांची लोणीकर यांनी पाहणी करुन तेथील नागरिकांशी संवाद साधला.