ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बुध्दाचे तत्वज्ञान जगमान्य -हरिभाऊ बागडे

औरंगाबाद, दि. 23 (प्रतिनिधी)- तथागत गौतम बुध्दाचा जन्म भारतात झाला आणि त्यांचे विचार आणि तत्वज्ञान मात्र जगाने स्वीकारले. जगात शांती-सद्भाव नांदण्यासाठी त्यांचे विचार स्वीकारले गेले पाहिजे, असे मत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील त्रिरत्न बुध्द विहाराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 
अध्यक्षस्थानी मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. एम.ए. वाहूळ हे होते. महात्मा फुले व शाहु महाराज प्रतिष्ठानतर्फे आयोजित या लोकार्पण सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए.चोपडे, माजी प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोबंरे, गदानाचे माजी सरपंच प्रकाश पाटील अधाने, शिवाजी पाटील अधाने, डॉ.एम. सत्यपाल, जनार्दन शेजवळ आदी उपस्थित होते.
बागडे म्हणाले की, गौतम बध्द आणि बाबासाहेबांचं जगमान्य विचार सर्व खेड्या-पाड्यांनी स्वीकारावेत. गावाने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाची उज्ज्वल परंपरा दिली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबू शकतात, असा आशावाद बागडे यांनी व्यक्त केला. 85% शेतकर्‍यांच्या आत्महत्या या दुग्धव्यवसाय नसलेल्या गावात झालेल्या आहेत. 15 % आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांमध्ये कुणीही दुग्ध् व्यवसाय करणारा नव्हता, त्यामुळे आत्महत्या रोखवण्यासाठी दुग्धव्यवसाय आदर्श पर्याय असल्याचेही बागडे म्हणाले. दुष्काळ आणि पाण्याच्या दुर्भिक्षासंदर्भात बागडे म्हणाले, ज्याप्रमाणे रांजनातले पाणी आपण संपवून टाकतो, तसे पुन्हा भरतो. त्याचप्रमाणे जमिनीतल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊनही आपण पुनर्भरण करत नाही. पाण्याचे पुनर्भरण केले तरच राज्य व पर्यायाने गावे दुष्काळमुक्त होतील.
कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, बुध्द विहार हे विज्ञानाचे केंद्र व्हावीत. येथे संपूर्ण गावकरी एकत्र येऊ नवा आदर्श निर्माण करतील. महानुभव पंथाचे संस्थापक श्री. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या गदाना या गावात सर्वांनी एकत्र येऊन बुध्दविहाराचे निर्माण केले. याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम.ए. वाहुळ यांनी केले तर स्वाती वाहुळ यांनी सूत्रसंचलन, भास्कर वाहुळ यांनी आभार मानले. यावेळी तहसीलदार बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, नगरसेवक राजू शिंदे, ज्ञानेश्वर नलावडे, डॉ. जे.एम. मंत्री, डॉ. रा.का. क्षीरसागर, डॉ. पी.के. भालेराव आदी उपस्थित होते.