ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पावसाळ्यात सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून सतर्क रहावे - डॉ. दांगट

औरंगाबाद, दि. 25 (प्रतिनिधी)-येणार्‍या पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी विभागातील सर्व संबंधीत यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून अधिक सतर्क राहण्याच्या सुचना विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी मंगळवारी दिल्या.
येणार्‍या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागातील नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील पूर्वतयारीबाबतचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ.दांगट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नांदेड परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, कर्नल ब्रीज, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, उपायुक्त जितेंद्र पापळकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी.ए.बिराजदार तसेच जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, कृषी, आरोग्य, दूरसंचार, महानगरपालिका आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ.दांगट म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रभावीपणे काम करण्यासाठी पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. आपत्तीच्या कालावधीत समन्वय व संपर्काला विशेष महत्त्व असते. विभागात सन 2005-2006 मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा देखील प्रभावीपणे व सतर्कतेने काम करण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेली जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरक्षित टप्प्यात आणावीत ज्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. मातीचे बंधारे, सिमेंट बंधारे, लघु बंधार्‍यांचा सर्वे करुन विकेंद्रित पाणीसाठ्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर ऑडीट करावे. तसेच पूर रेषेच्या आतील गावांमधील लोकांचे स्थलातंरण लवकरात लवकर करावे. आपत्ती व्यवस्थापनात सर्व विभागाने चांगली तयारी केली असून जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकादेखील झाल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
या बैठकीत उपायुक्त (महसूल) जितेंद्र पापळकर यांनी विभागातील एकूण पूर्वतयारीबाबत माहितीचे सादरीकरण केले. तर बिराजदार यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून जलसंपदा विभागाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. यावेळी सर्व जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आढावा घेण्यात आला. तसेच औरंगाबाद, परभणी, लातूर व नांदेड महानगरपालिका यांनी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.