ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बीड जिल्ह्याला सर्वाधीक पीक विमा

बीड, दि. २७ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्याला सर्वाधीक पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याला ८९२ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विमा मिवणारा बीड हा जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

दुसरीकडे बीडपाठोपाठ लातूर जिल्ह्याला 604 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

लातूर , बीडला सर्वाधिक निधी
राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील 11 लाख 72 हजार 767 शेतकऱ्यांनी 61 कोटी 12 लाख 74 हजार एवढा पीक विमा भरला होता. सुमारे 11 लाख 43 हजार 698 शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे विम्यापोटी शेतकऱ्यांना एकूण 892 कोटी 97 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

बीड नंतर लातूर जिल्ह्याला सर्वाधिक पिक विमा मंजूर झाला आहे. लातूर जिल्ह्यातील 11 लाख 84 हजार 321 शेतकऱ्यांनी 31 कोटी 19 लाख रुपये विमा भरला होता. त्यापैकी 10 लाख 74 हजार 252 लाभार्थी शेतकऱ्यांना 604 कोटी 59 लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे.