ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जलसंधारणाच्या कामाबाबत समाधानी मात्र फलनिष्पत्तीवर लक्ष द्या - शिवतारे

उस्मानाबाद, दि. 28 (प्रतिनिधी)- जिल्ह्यात झालेल्या जलसंधारणाच्या, जलयुक्त शिवाराच्या कामांबाबत मी अत्यंत समाधानी आहे. मात्र या कामांमुळे तसेच पावसाची कृपा चांगली झाल्यास जनतेला नेमका कसा व किती लाभ होईल याची वस्तुनिष्ठ माहिती तयार करण्यावर प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी सूचना जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित अधिकार्‍यांना दिली. जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा कृषी अधीक्षक जमदाडे, कार्यकारी अभियंता देवकर आदि अधिकारी उपस्थित होते. शिवतारे यांनी जलयुक्त शिवार अभियानाशी संबंधित सर्व विभागांनी केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, वनविभाग, लघुसिंचन (जलसंधारण), लघुपाटबंधारे(जि.प.), सामाजिक वनीकरण आणि जलसंपदा विभागाचा समावेश होता. यावेळी प्रत्येक विभागाने जिल्ह्यात झालेली कामे, प्रलंबित कामे, झालेल्या कामांवर आतापर्यंत झालेला खर्च इत्यादिबाबतची सविस्तर माहिती राज्यमंत्री शिवतारे यांनी सादर केली.
शिवतारे म्हणाले, कोल्हापूर बंधारे हा एक उत्तम पर्याय आहे. जिल्ह्यातील सर्व कोल्हापूर बंधार्‍यांची तांत्रिक पाहणी करुन, किती बंधारे दुरुस्ती योग्य आहेत, किती बंधारे नष्ट करण्यायोग्य आहेत याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. यात कृषी विभागाने या अभियानांतर्गत आत्तापर्यंत एकूण 15841 कामे पूर्ण केली असून एकूण 135484.96 हेक्टर क्षेत्रापैकी 74179 हेक्टर क्षेत्रास याचा लाभ होईल, असे सांगितले. या झालेल्या कामांसाठी आतापर्यंत रु. 9758.80 लक्ष इतका खर्च झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. वनविभागाने एकूण 185 पैकी 175 कामे पूर्ण केली असून 571 हेक्टर क्षेत्रास त्यामुळे लाभ होईल असे सांगितले. या कामांसाठी रु.166.47 लाख इतका निधी खर्च करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. लघुसिंचन (जलसंधारण) विभागाने 194 कामांपैकी 167 कामे पूर्ण झाली आहेत व त्यासाठी रु.1382.11 लक्ष इतका निधी खर्च करण्यात आला आहे असे सांगितले. लघुपाटबंधारे विभागाने एकूण 259 कामांपैकी 69 कामे पूर्ण झाली असून त्याकरिता रु. 529.24 लक्ष निधी खर्च झाल्याची माहिती मंत्रीमहोदयांना दिली. जलसंपदा विभागाने 91 कामे पूर्ण केली असून रु.300.02 लक्ष खर्च झाल्याचे सांगितले. अशा प्रकारे इतर शासकीय यंत्रणांची एकूण 5184 कामे असून त्यामुळे 2668.11 हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. आतापर्यंत यापैकी 2463 कामे पूर्ण झाली असून त्याकरिता रु.2736.11 लक्ष इतका निधी खर्च झाला आहे. 
राज्यमंत्री शिवतारे यांनी बैठकीच्या शेवटी वृक्षलागवड मोहीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याबाबत तसेच जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना आणि जनतेलाही आवाहन केले. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, जि.प. सदस्य धनंजय सावंत, जलयुक्त शिवाराच्या कामासंबंधित विविध विभागांचेअधिकारी उपस्थित होते.