ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकर्‍यांनी उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत व्यवस्थापन केल्यास सुबत्ता- बागडे

औरंगाबाद, दि. 1 (प्रतिनिधी)- जमिनीचे पोत पाहून शेतकर्‍यांनी पिके घेतल्यास आणि पडणार्‍या पावसाचे पाणी शेताजवळ मुरवल्यास तसेच विहिरीचे पुनर्भरण केल्यास चांगला लाभ होणार आहे. शिवाय शेतकर्‍यांनी उत्पादनापासून विक्रीचे स्वत:चे व्यवस्थापन केल्यास आर्थिक सुबत्ता येईल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.
टोणगाव (ता. औरंगाबाद) येथील शेतकर्‍याच्या पॉलिहाऊसमध्ये बागडे यांच्या हस्ते मिरची लागवड करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांची प्रमुख उपस्थिती होती. पावसाच्या पाण्याचे महत्व सांगताना बागडे म्हणाले, वॉटर हार्वेस्टिंग या इस्त्राली तंत्रज्ञानाने शेतीला पाणी उपलब्ध करण्याच्या प्रयत्नाकडे वळण्याची आवश्यकता आहे. पाणी जपून वापरण्याची सवय ही आता अंगवळणी पडली पाहिजे. 50 ते 60 वर्षापूर्वी नद्या, नाले भरभरून वाहत होते, कारण त्यावेळी पाण्याचा उपसा कमी होता. आता पाण्याचा वापर वाढल्याने भूगर्भातील पाणी पातळी खूपच खाली गेली आहे. यामुळे पाणी गोळा करायला शिकले पाहिजे, शिवारातील पाणी शिवारातच अडवले पाहिजे.
डॉ. दांगट म्हणाले, टोणगाव परिसरात पाणी टंचाई असताना शेतकर्‍यांनी शेडनेट व पॉलिहाऊसद्वारे कृषी उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. आता समुह शेतीची संकल्पना पुढे येत आहे. अशा गट शेतीतून शेतकर्‍यांना लागवड खर्च वाचविता येतो. नुकताच मागच्या वर्षी एन.आर.एच.एम.मधून भाजीपाला लागवडीच्या कार्यक्रमासाठी विभागस्तरावर जवळपास आठ कोटी रूपये खर्चून शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळविण्यात आले. काही शेतकरी लागवडीच्या खर्चामध्ये शेडनेट उभे करू शकतात आणि ज्यांची ऐपत चांगली आहे ते पॉलिहाऊस उभे करतात, असे सांगून डॉ. दांगट म्हणाले, शेतकर्‍यांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील फलोत्पादन प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेतल्यास खत, पाणी, हवा, वीज, माती याचा कार्यक्षम वापर कसा करावा याची माहिती मिळेल. शेतकर्‍यांनी आपल्या मालाच्या विक्रीसाठी स्वत:चे विक्री केंद्र उभारावे तसेच बिगर मोसमी शेतीकडे वळल्यास देखील उत्पादन वाढू शकेल. शेतमालाचे ग्रेडींग, पॅकिंग, मार्केटिंग व बँकिंग इत्यादी गोष्टी स्वत:च कराव्यात. यानिमित्त सर्जेराव ठोंबरे, विठ्ठलराव भोसले यांनीही शेती उपयोगी माहिती सांगितली. शिक्षण घेऊन नोकरीचा हव्यास न ठेवणारे व आधुनिक शेती करणारे भरत आहेर यांनीही यावेळी शेडनेट व पॉलिहाऊसमधून उत्पन्न कसे वाढेल याविषयी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब आहेर यांनी आभार मानले.