ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मांजरा, निम्न तेरणा प्रकल्पाच्या भूसंपादनाचे पैसे दोन महिन्यात देणार - महाजन

लातूर, दि. 3 (प्रतिनिधी)- मांजरा आणि निम्न तेरणा या दोन नद्यांवरील प्रकल्पाची कामे पूर्ण होत आली आहेत. परंतू भूसंपादनाचे 160 कोटी रुपये शेतकर्‍यांना देणे असल्याने काही बंधार्‍यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवता येत नाही. या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यासाठी येत्या दोन माहिन्यात शेतकर्‍यांना मावेजाचे 160 कोटी रुपये देणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.सुनिल गायकवाड, आमदार अमित देशमुख, डॉ.सुधाकर भालेराव, त्र्यंबक भिसे, महापौर दिपक सुळ, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, औरंगाबाद येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता बी.डी.तोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाजन म्हणाले, लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी आणि सिंचनासाठी मांजर व निम्न तेरणा हे दोन मुख्य स्त्रोत आहेत. मांजरा व निम्न तेरणा या दोन नद्यावरील प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठविल्यास लातूर जिल्ह्याला दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. याकरीता आवश्यक ती कार्यवाही येणार्‍या दोन महिन्यात करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देवून लातूर शहरास शाश्वत पाणी पुरवठा करण्यासाठी उजनीहून धनेगाव प्रकल्पात बंद नळाद्वारे पाणी आणण्यासाठीची व्यवहार्यता तपासून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागास दिल्या आहेत. तावरजा प्रकल्पावर गेट बसविण्यासाठीही तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधीतांना यावेळी दिल्या.
यावेळी बैठकीस परळी येथील बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता एस. आर. तिरमनवार, बीड येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधिक्षक अभियंता सुनंदा जगताप, बीड येथील यांत्रिक मंडळाचे बोडके, निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे, उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, महावितरणचे अधिक्षक अभियंता वासने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता सतिष सुशिर, कार्यकारी अभियंता प्रविण पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.