ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उस्मानाबादमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू

उस्मानाबाद, दि. ४ (प्रतिनिधी) - दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याला वरुणराजाने काहीसा दिलासा दिला आहे. वादळी वारा आणि जोरदार गारपीटीसह पावसाने हजेरी लावली.

उस्मानाबाद शहरात वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळून पडले आहेत. कळंब तालुक्यातील खोंदला गावात वीज पडून एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

उस्मानाबाद शहरासह वाशी, तुळजापूर कळंब तालुक्यातही मान्सूनपूर्व पावसाने काल दुपारी हजेरी लावली. या वादळी पावसांमुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनावरंही दगावल्याची शक्यता आहे.