ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उस्मानाबाद जिल्ह्यातील दारफळ गाव ठरले पहिले लोकराज्यग्राम

उस्मानाबाद, दि. 15 (प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्यात या वर्षातील पहिले लोकराज्यग्राम बनण्याचा बहुमान उस्मानाबाद जिल्ह्यातील दारफळ गावाने मिळविला आहे. या गावातील शंभर टक्के कुटुंबे लोकराज्य मासिकाची वार्षिक भरून वर्गणीदार झाले आहेत.
यावेळी आदित्य गोरे हे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत म्हणाले, जिल्ह्यातील अति दुष्काळग्रस्त असलेले दारफळ हे गाव लोकराज्यग्राम झाल्यामुळे महाराष्ट्रात प्रकाशझोतात येईल. हे गाव लोकराज्यग्राम झाल्यानंतर लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जसे पीक विमा योजना, पीक कर्जाच्या पुनर्गठनाचा निर्णय, यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्याने केलेले नियोजन, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना इत्यादी शासन निर्णय व शासकीय योजना लोकराज्यच्या माध्यमातून या गावापर्यंत पोहोचतील. 
श्रीमती बंडगर शासनाच्या वतीने लोकराज्यचे महत्त्व यावेळी विशद करताना म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय व योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम लोकराज्य मासिक करते. याशिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या सर्व उमेदवारांना उपयुक्त माहितीही लोकराज्य या मासिकातून उपलब्ध करुन दिली जाते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी ग्रामस्थांशी मोबाईलवरुन संवाद साधला. यावेळी सरपंच बालिका सुतार, उपसरपंच ज्योती जाधव, ग्रामसेविका लोखंडे व सर्व ग्रामस्थ हेही उपस्थित होते.