ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

म्हणावी तशी पेटली नाही ‘ट्यूबलाईट’

मुंबई, दि. २४ - म्हणावा तसा प्रतिसाद सुपरस्टार सलमान खानच्याट्यूबलाईटचित्रपटाला मिळालेला नाही. ईदच्या मुहूर्तावर सलमानचे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ट्यूबलाईटने पहिल्या दिवशी सर्वात कमी कमाई केली आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २१.१५ कोटीची कमाई केली असल्याची माहिती ट्रेंड अॅनालिस्ट तरुण आदर्शने ट्विटरवरुन दिली आहे.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ट्यूबलाईटने पहिल्या दिवशी म्हणावी तशी कमाई केली नाही. सलमानने गेल्या काही वर्षांपासून ईदच्या मुहूर्तावर चित्रपट रिलीज करण्याचा ट्रेंड सुरु केला आहे. आतापर्यंत त्याचे हे समीकरण बरेच चांगले जुळून आले होते. पण मागील काही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाची कमाई पाहता ट्यूबलाईटची कमाई तशी कमीच झाली आहे.

२०१६साली ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सुलतानने पहिल्याच दिवशी ३६.५४ कोटींची कमाई केली होती. तर त्याआधी प्रदर्शित झालेल्याबजरंगी भाईजानने पहिल्या दिवशी २७.२५ कोटीची कमाई केली होती. किक चित्रपटाने पहिल्या दिवशी २६. कोटीची कमाई केली होती. एक था टायगर चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल ३२.९३ कोटींची कमाई केली होती. दरम्यान, ट्यूबलाईट हा चित्रपट १९६२च्या भारत आणि चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे.