ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ट्युबलाईटवर टीका करणाऱ्यांवर सलमानची आगपाखड

मुंबई, दि. २६ - बॉलिवूडच्या दबंग सलमान खानचाट्युबलाईटहा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. सलमानने या चित्रपटाला मिळालेल्या निगेटीव्ह रिव्ह्यूवर त्याच्या अंदाजात नाराजी व्यक्त केली. चित्रपटाला - किंवा - रेटींग मिळेल, असे वाटले होते. पण, समीक्षकांनी .५० रेटींग दिल्याने मी खूश आहे असे सलमान उपरोधिकपणे म्हणाला.

माझ्या अपेक्षेपेक्षा चित्रपटाची समिक्षा खूप बरी होती, असे सलमानने पीव्हीआर ग्रुप आणि बिईंग ह्युमनच्या एका कार्यक्रमात म्हटले. यासाठी - किंवा - रेटींग मिळेल, असे मला वाटत होते. पण, समीक्षक फार चांगले आहेत. त्यांनी चित्रपटाला .५० रेटींग दिल्याने मी आनंदी आहे. याबद्दल मी माझ्या माणसांना विचारले की, लोक मला रडताना बघून हसत आहेत का? त्यावर उलट मला रडताना बघून तेसुद्धा रडत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मग उलट चिंतेची काहीच बाब नाही, असे मी म्हणालो.

जेव्हा सलमान ईदच्या मुहूर्तावर आपल्या नवीन चित्रपटातून पडद्यावर झळकतो. तेव्हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उल्लेखनीय कमाई करतो. यंदा बॉक्स ऑफिसवर कबीर खान दिग्दर्शित ट्युबलाईट या चित्रपटाबद्दल तेवढा प्रकाश नाही पाडू शकला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २१.१५ कोटींची कमाई केली. जी आधीच्याबजरंगी भाईजानआणि सुल्तान या चित्रपटांपेक्षा कमी आहे. पण, या आकड्यांमुळे मी काही चिंतेत नाही. हा चित्रपट बऱ्यापैकी कमाई करेल, असेही सलमान पुढे म्हणाला.