ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तारक मेहता… आता तेलुगूत तारक माम्मा अय्यो रामा नावाने

मुंबई, दि. २९ - सब टीव्हीवरीलतारक मेहता का उल्टा चष्माही मालिका विनोद, प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या भूमिका, उत्तम कथानकामुळे घरोघरी पाहिली जाते. ही मालिका पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्सुक असतात. निर्मात्यांनी मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता आपला प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठी तेलुगू भाषेतही मालिका आणण्याचा निर्णय घेतला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्माही मालिका आता तेलुगू भाषिकांना आता आपल्या मातृभाषेत पाहता येणार आहे. ‘तारक माम्मा अय्यो रामाअसे तेलुगूतील मालिकेचं नाव असणार आहे. ही मालिका टीव्ही प्लस इंडिया या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. दररोज संध्याकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मालिकेचे निर्माते आसित मोदी याबाबत म्हणाले की, संपूर्ण उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतातील प्रेक्षकांची ही सर्वांत आवडती मालिका आहे. ही मालिका भारताबाहेर असलेले भारतीय आणि अन्य देशातील काही प्रेक्षकही आवर्जून बघतात.