ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्यात तब्बूच्या सिनेमाचं शूटिंग बंद पाडलं

पुणे, दि. १ - बॉलिवूड अभिनेत्री तब्बूची भूमिका असलेल्यापियानो प्लेयरचित्रपटाचं पुण्यातील शूटिंग बंद पाडण्यात आलं. स्थानिक रहिवाशांनी ट्राफिक जाम झाल्याची तक्रार केल्यामुळे नगरसेविकेच्या पतीने हे चित्रीकरण बंद पाडलं. पुण्यातील खडकी कँन्टोन्मेंट परिसरात शुक्रवारी सकाळी .३० वाजल्यापासून .३० वाजेपर्यंत रस्ता बंद करुन चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. रस्ता अडवल्यानं परिसरात ट्रफिक जॅम झाला. याची तक्रार स्थानिकांनी नगरसेविका वैशाली पैहलवान यांच्याकडे केली.

त्यानंतर नगरसेविकेचा पती कैलाश पैहलवान यांनी घटनास्थळी जाऊन शुटिंगची परवानगी घेतली आहे का, असा सवाल विचारला. परंतु परवानगीचं कोणतंही परिपत्रक टीमला दाखवता आल्याने शूटिंग आवरतं घेत युनिटने काढता पाय घेतला.

युनिटने वाहतूक पोलिसांकडून विना हरकत पत्र मिळवलं होतं. मात्र खडकी कँटोन्मेंट हा भाग संरक्षण विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे केसीबी (खडकी कँटोन्मेंट बोर्ड)ची संमतीही आवश्यक होती. याविषयी कल्पना देऊनही चित्रपटाच्या टीमने ऐन गर्दीच्या वेळी रस्त्यावर शूटिंग करत वाहतूक रोखली.

हा प्रकार घडला त्यावेळी तब्बू उपस्थित असल्याची माहिती आहे. पियानो प्लेयर चित्रपटात तब्बूशिवाय आयुषमान खुराना आणि राधिका आपटे झळकणार आहेत.