ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कपिलने घेतला सलमानसोबत पंगा

मुंबई, दि. ४ - विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी असून बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानच्या बॅड बॉक्समध्ये कपिल शर्माची एंट्री झाली आहे.

अनेक अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार यांना बॉलीवुडमध्ये आणून सलमानने त्यांचे नशिब चमकावले आहे. अनेक अभिनेत्रींची सध्याची ओळख ही पहिल्या चित्रपटात सलमान सोबत काम केल्याने झाली आहे. पण यावेळी सलमान खाननेट्युबलाईटचे प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जाणे टाळले. सलमान खानने त्याऐवजी कपिलचा स्पर्धक असलेल्या सुनील ग्रोवरच्या शोला पसंती देत आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले.

सलमानच्या या नाराजीची वेगवेगळी कारणे असून मात्र सुत्रांच्या सांगण्यानुसार असे कळते की जेव्हा गेल्यावेळेस सलमान कपिलच्या शो ला गेला होता तेव्हा कपिलने त्याला खुप ताटकळत ठेवले होते. एवढच नव्हे तर कपिलने सलमानला नीट स्क्रीप्टही दिले नव्हते आणि दिलेल्या स्क्रिप्टमध्येही शेवटपर्यंत तो बदल करत राहीला.

तेव्हा सलमान खान शांत राहिला पण सलमानने येत्या दिवसात कपिलशी बदला घेण्यास सुरुवात केली आहे. एका वृत्तानुसार फिल्म फेअर अवार्डमध्ये कपिल शर्माला शाहरुख खान सोबत एक कव्वालीची रिहर्सल करायची होती. पण नेहमी लेट येणारा कपिलने शाहरुखलाही त्याची वाट बघायला लावली. जेव्हा सलमानने शाहरुखला वाट बघताना पाहिले तेव्हाही तो खुपच रागावला होता. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात सलमान खानने अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानशी हाय हेल्लो केले पण कपिल शर्माकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले.