ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सिद्धू पाजी कपिलच्या शोमधून कमावतात २५ कोटी

मुंबई, दि. ६ - टेलिव्हिजन क्षेत्रात कॉमेडी किंग कपिल शर्माचा कपिल शर्मा शोहा एक नामांकित शो असून माजी क्रिकेटर नवज्योतसिंह सिद्धूही या शोमध्ये तुफान विनोद, शेरोशायरी करताना दिसतात. पण सिद्धू यांना याच शो साठी किती रक्कम मिळते? जवळपास ४५.९१ कोटींची संपत्ती नवज्योतसिंह सिद्धू यांच्याकडे आहे. त्याच्याकडे ४४ लाखाचे घड्याळ, दोन लँड क्रूजर, एक मिनी कूपर कार आणि १५ लाखाचे दागिने आहेत.

कपिलच्या शोसाठी सिद्धू यांना मिळणारी रक्कमही तुम्हा-आम्हाला अवाक् करायला लावणारी आहे. एका वेबसाईटनुसार कपिलच्या शोद्वारे सिद्धू यांना वर्षाला २५ कोटी रुपये मिळतात. काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले सिद्धू हे सध्या पंजाबमध्ये मंत्री आहे. मात्र मंत्रिपदावर असूनही या शोमध्ये हजेरी लावण्यावरुन वाद निर्माण झाला होता.

पण सिद्धू यांनी या वादावर त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले होते. जर मला काही अडचण नाही तर तुम्हाला का? मला या शोमध्ये सहभागी व्हायचे असेल तर मी पंजाबमधून तीन वाजता निघेन आणि पहाटे कोणी उठायच्या आत पंजाबमध्ये परत येईन, असे सिद्धू म्हणाले होते.