ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुन्हा टीव्हीवर झळकणार दादा कोंडकेंचे चित्रपट

पुणे, दि. ८ - आता टीव्ही चॅनलवरही दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचे चित्रपट पाहता येणार आहेत. दादा कोंडकेंच्या भाचे सून माणिक मोरे यांच्या बाजूने दादा कोंडकेंच्या चित्रपटांच्या हक्कांसंदर्भात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल लागला आहे.

दादा कोंडकेंच्या भाचे सून माणिक मोरे आणि नुपुर कंपनीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या हक्कांवरुन न्यायालयात खटला सुरु होता. दादा कोंडकेंच्या चित्रपटांच्या बनावट सीडी आणि डीव्हीडी नुपुर कंपनीने तयार करुन विकल्याचा आरोप माणिक मोरे यांनी केला होता. माणिक मोरेंनी त्यासंदर्भात नुपुर कंपनी विरोधात पुणे सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.

माणिक मोरे आणि नुपुर कंपनीतला हा वाद तब्बल १५ वर्षे चालला. त्यानंतर या खटल्याचा निकाल माणिक मोरेंच्या बाजूने लागला. त्यामुळे माणिक मोरे आता त्यांच्या अधिकारामध्ये दादा कोंडकेंचे चित्रपट टीव्ही चॅनलवर लावण्यासाठी देऊ शकणार आहेत. दादा कोंडकेंच्या एकूण १९ चित्रपटांपैकी १७ चित्रपटांचे हक्क माणिक मोरे यांच्याकडे आहेत. ज्यामध्येपांडू हवालदार’, ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’, ‘सोंगाड्या’, ‘वाजवू काया हिट चित्रपटांचा समावेश आहे.