ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मकरंद अनासपुरे साकारणार तात्याराव लहानेंची भूमिका

मुंबई, दि. ११ - एक लाखांहून अधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर आता चित्रपट बनविण्यात येणार आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे चित्रपटात लहाने यांच्या भूमिकेत दिसणार असून, लहानेंच्या पत्नीची भूमिका अलका कुबल साकारणार आहेत.

या चित्रपटाचे नावडॉ. तात्या लहाने: अंगार पॉवर इज विदीनसे आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी चित्रपटाचे दिग्दर्शक विराग वानखेडे यांनी चक्क आपले नेरूळचे घर विकले आणि अथक परिश्रमांनी हा चित्रपटा तयार केला आहे. त्याने आपले नेरूळचे घर चित्रपटासाठी विकून पैसा उभा केला. चित्रपटासाठीची त्याची धडपड पाहूनच मी त्याला चित्रपट करण्यासाठी परवानगी दिल्याचे खुद्द डॉ. लहाने म्हणाले.

लातूर जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले. १९९१ मध्ये लहान वयातच मूत्रपिंडाचा विकार झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्यांना आईचीच किडनी बसवण्यात आली आणि डॉ. लहाने यांचा जणू पुनर्जन्मच झाला.

डॉ. लहाने यांना नेत्रशल्यचिकित्सा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव म्हणून आतापर्यंतमराठवाडा गौरव पुरस्कार’, ‘लातूर गौरव पुरस्कार’, ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’, ‘जीवनगौरव पुरस्कारअशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.