ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्वप्नीलच्या ‘भिकारी’चा अफलातून ट्रेलर

मुंबई, दि. १३ - नुकताच अभिनेता स्वप्नील जोशी याच्या आगामीभिकारीया चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या ट्रेलरमुळे आता या चित्रपटाची उत्सुकता आणखीन ताणली गेली आहे.

गणेशाच्या प्रतिमेजवळ झोपलेला स्वप्नील पोस्टरवर दिसल्यापासून या चित्रपटाबद्दल अनेकांची उत्सुकता वाढली होती. कधी चांगल्या तर कधी फाटक्या कपड्यातील स्वप्नीलच्या लूकमुळेही सर्वांना प्रश्न पडला होता. पण या चित्रपटाच्या कथेचा आता जवळपास खुलासा झालाच आहे. स्वप्नील यात एका श्रीमंत आणि नंतर एका भिका-याची भूमिका करतो आहे. ॅक्शन, ड्रामा, रोमान्स असा मसाला या चित्रपटात बघायला मिळणार असे ट्रेलरवरून दिसते आहे.

स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार, गुरू ठाकूर आणि क्रिती अडारकर यांच्याभिकारीयाचित्रपटात मुख्य भूमिका आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती गणेश आचार्य आणि शरद केळकर यांनी केली आहे. मिलिंद वानखेडे आणि विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. गणेश आचार्य यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.