ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुक्तामुळे पुन्हा समोर आला नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न

मुंबई, दि. १३ - नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत अनेक कलाकारांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या, तक्रारी केल्या आहेत. पण पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरवस्थेचे चित्रण आज पुन्हा एकदा अभिनेत्री मुक्ता बर्वेने सर्वांसमोर आणले आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरून नाट्यगृहातील शौचालयाचे फोटो मुक्ताने शेअर केल्यामुळे नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

नाट्यगृहातील अस्वच्छ शौचालय मुक्ताने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये दिसत असून तिने हे फोटो शेअर करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आपला राग व्यक्त केला आहे. ‘याला गलथानपणा म्हणायचा, बेजबाबदारपणा म्हणायचा की