ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रिंकू भाभी ईज बॅक

मुंबई, दि. १ - कपिल शर्मा शोमध्ये सुनील ग्रोवर जेव्हा रिंकू भाभीच्या भूमिकेत पडद्यावर यायचा तेव्हा प्रेक्षक खळखळून हसायचे. या भूमिकेची आणि सुनील ग्रोवरची कमतरता कपिलच्या शोमध्ये अजूनही भासते. कपिलने म्हणूनच सुनीलला शोमध्ये परतण्यास अनेकदा विनंती केली. पण अजूनही सुनील नाराजच असल्याचे म्हणावे लागेल. पण मुंबईतील एका कार्यक्रमात बऱ्याच दिवसांनंतर रिंकू भाभीला पाहिले गेले.

रिंकू भाभी म्हणजेच सुनील ग्रोवरची विशेष उपस्थिती मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या नॅशनल ज्वेलरी अॅवॉर्ड शोमध्ये पाहायला मिळाली. सुनीलने यावेळी रिंकू भाभीच्या वेशभूषेत रॅम्प वॉक केला. पुन्हा एकदा रिंकू भाभीच्या सुनीलला अंदाजात पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. काळा चष्मा, खांद्यावर झोळी आणि हातात एक कॅरी बॅग घेऊन रॅम्प वॉक करत रिंकू भाभीने शोमध्ये पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली.