ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नासात ट्रेनिंग घेतो आहे सुशांत सिंह राजपूत

मुंबई, दि. २ - अभिनेता सुशांत सिंह राजपूतचंदा मामा दूर केया आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात सुशांत अंतराळवीराची भूमिका साकारणार असून त्याला त्यासाठी थेटनासामध्ये ट्रेनिंग देण्यात येणार आहे. नासामध्ये स्पेशल ट्रेनिंग होणारा हा पहिलाच बॉलिवूडपट ठरला आहे.

व्हाईट स्पेससूट घातलेले फोटो सुशांतने ट्विटरवर शेअर केला आहे. खऱ्याखुऱ्या अंतराळवीरांना अत्यंत कठीण प्रशिक्षण दिले जाते. तुमचा अनुभव, कौशल्य आणि एकाग्रता पणाला लागते. त्याचवेळी तुम्हाला ताण घेऊन चालत नाही. ही पास किंवा फेल स्थिती नसते, तर जीवन किंवा मरणाचा प्रश्न असतो, असे ट्विट सुशांतने केले आहे.

सुशांतने यूएसमधील नासा सेंटरला जुलै महिन्यात भेट दिली होती. तिथे झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव त्याने घेतला. लहान रॉकेटपासून सुरु झालेला प्रवास भव्य अंतराळयानापर्यंत. माझ्या आईची नेहमीच मला अवकाशात पाहण्याची इच्छा होती, असे सुशांतने ट्विटरवर म्हटले होते. संजय पुरण सिंग चौहान यांचे दिग्दर्शन असलेल्याचंदा मामा दूर केचित्रपटात नवाझुद्दीन सिद्दिकी, आर माधवन यांच्याही भूमिका आहेत.