ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

साहोमध्ये प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार श्रद्धा

मुंबई, दि. ३ - अनुष्का आणि प्रभास ही जोडी आणि त्यांच्यातली अनोखी केमिस्ट्री आपणबाहुबलीचित्रपटात पाहिली. आजही या जोडीचे अनेकजण दिवाने आहेत. ‘साहोचित्रपटात या दोघांची वाढती क्रेझ पाहून या दोघांना पुन्हा एकदा एकत्र साइन करण्यात आल्यामुळेसाहोचित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. पण सुरूवातीलासाहोचित्रपटात अनुष्का शेट्टीचे नाव जरी पुढे आले असले तरी या प्रोजेक्टमधून आता तिला वगळण्यात आले आहे. तिच्या हातून हा चित्रपट वाढत्या वजनामुळे गेला असल्याचे म्हटले जात आहे.

आता कोणती अभिनेत्रीसाहोमध्ये काम करणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतानाच त्याचे उत्तरही निर्मात्यांनी तयार ठेवले असून आता प्रभाससोबतसाहोचित्रपटात बॉलिवूडचीहसीनाअर्थात श्रद्धा कपूर काम करणार हे निश्चित झाले आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांना सुरूवातीपासूनच एखादी बॉलिवूड अभिनेत्री हवी होती. सोनम कपूर, कतरिना कैफ, दीपिका पादुकोण, तमन्ना भाटिया आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींना या चित्रपटासाठी निर्मात्यांनी विचारले होते. पण मानधन जास्त सांगितल्यामुळे निर्माते अनुष्का शेट्टीकडे गेले होते. पण आता हा चित्रपट श्रद्धाच्या पदरात पडला असेच म्हणावे लागेल.