ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अक्षयच्या ‘पॅडमॅन’चा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई, दि. ४ - अक्षय कुमारच्या आगामीपॅडमॅनया चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा फर्स्ट लूक या चित्रपटाची निर्माती ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे. ट्विंकलने चित्रपटाच्या फर्स्ट लूकसोबतच प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. २०१८च्या १३ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे ट्विंकलने ट्विटमध्ये म्हटले आहे.

घाटाच्या बाजूला अक्षय सायकलवर दोन्ही हात वर करुन बसलेला या फर्स्ट लूकमध्ये पाहायला मिळतो आहे. त्याचा आनंदी आणि हसरा असा चेहरा यामध्ये पाहायला मिळतो आहे. सोनम कपूरचीही अक्षयसोबतच चित्रपटात भूमिका असणार आहे. ‘पॅडमॅनहा चित्रपट पहिल्यांदा सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरुणाचलम मुरूगनाथ यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अक्षय या चित्रपटात अरुणाचलम यांची भूमिका साकारणार आहे