ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नागराज मंजुळेंच्या आगामी चित्रपटात बिग बी

मूंबई, दि. ७ - दिग्दर्शक नागराज मंजुळे सैराट या मराठी चित्रपटाच्या दैदिप्यमान यशानंतर आता बॉलिवूडच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करताना थेट बिग बी अमिताभ बच्चन यांनाच पाचारण केल्याची चर्चा आहे.

अमिताभ बच्चन नागराज मंजुळेंच्या आगामी हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील या चर्चेला उधाण आले आहे. मराठी प्रेक्षकांसह अमराठी प्रेक्षकांनीही मंजुळेंचा सैराट हा चित्रपट पाहिला होता. सैराटच्या वादळानंतर आता नागराज मंजुळे कोणत्या विषयाकडे वळतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. चित्रपट जगतात सैराट या मराठी चित्रपटाने इतिहास निर्माण केला. आर्ची-परशा या व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. नागराजचे प्रत्येक चित्रपट हे हटके असतात. त्यामुळे अमिताभ नागराजच्या चित्रपटात दिसण्याची शक्यता मोठी आहे.