ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसीमध्ये सोनू सूद

मुंबई, दि. ८ - राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित ऐतिहासिक चित्रपटमणिकर्णिका क्वीन ऑफ झांसीभव्यतेबद्दल तसाच त्यातील स्टार- कास्ट बद्दल बराच चर्चेत आहे. राणी लक्ष्मीबाईची मध्यवर्ती भूमिका कंगना राणावत करीत असून तिच्याबरोबर अतुल कुलकर्णी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर टेलिव्हिजन गाजवलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेला एका मोठ्या भूमिकेसाठी साईन करण्यात आले.

पण आतामणिकर्णिकाच्या टीममध्ये मॅचो-मॅन सोनू सूद देखील सामील झाला आहे. याआधी सोनूनेजोधा अकबर’, ‘शहिद--आझमसारख्या ऐतिहासिक चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. तो राणी लक्ष्मीबाई यांचा सरदार असलेल्या सदाशिवची भूमिका साकारणार आहे. भूमिका खलनायकी असली तरी चित्रपटातील महत्वपूर्ण भूमिकांपैकी एक आहे. कारण त्याला हाताशी धरून इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईच्या साम्राज्याची उलथापालथ करण्याचा डाव आखला होता.

या भूमिकेबद्दल सोनू सूदने आपल्या भावना व्यक्त केल्या असून तो म्हणतो ही खरोखरीच आव्हानात्मक भूमिका आहे. ऐतिहासिक खरेखुरे पात्र असल्यामुळे अशा व्यक्तीचे सादरीकरण करताना मर्यादेत राहणे गरजेचे असते. किंबहुना ती जबाबदारी असते. क्रिश हा अत्यंत ओजस्वी दिग्दर्शक आहे आणि त्याची अभ्यासू टीम तंत्रज्ञांची मला मदत होणार आहे. चांगल्यातील चांगले काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सोनू म्हणाला आहे.