ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शौचालयाचे महत्त्व सांगणारा टॉयलेट-एक प्रेमकथा

मुंबई, दि. ११ - बॉक्स ऑफिसवर आज अक्षय कुमारचा बहुचर्चितटॉयलेट-एक प्रेमकथाहा चित्रपट प्रदर्शित झाला असून खेडेगावातील महिलांची शैाचासंबंधीच्या समस्या मांडणारा हा चित्रपट खळखळून हसवणारा देखील आहे. पण या चित्रपटाच्या माध्यमातून शौचालयाचे महत्त्व अन देशातील महिलांच्या अन महिलांविषयीच्या मानसिकतेवरही बोट ठेवले आहे. त्यामुळे ही कहाणी फक्तशौचालयाची नसूनसोचबदलणारी आहे. हा चित्रपट देशातील महिला आणि पुरुषांच्या विचारसरणीवर आणि सांस्कृतिक सभ्यतेवरही बोट ठेवतो. शौचासंबंधी खेडेगावातील महिलांना येणाऱ्या अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि त्यातून होणाऱ्या अत्याचारांनाही यामध्ये स्पर्श करण्यात आला आहे.

या चित्रपटाची कथा उत्तरप्रदेशातील एका गावात घरात किंवा गावात शौचालय नसल्याने विवाहिता सासर सोडून माहेरी गेली यावर बेतलेला असून पत्नीला परत आणण्यासाठी पती गावात सर्वांसाठी शौचालय व्हावे, म्हणून कसा लढा देतो, हे या चित्रपटामध्ये पाहता येते. पती पत्नीभोवती असलेल्या या चित्रपटात केशव घरात शौचालय बांधतो का? गावासाठी सार्वजनिक शौचालय उभारले जाते का? यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जावे लागेल.

भूमी पेडणेकर ही गुणी अभिनेत्री चित्रपटात स्वत:भोवती खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते, कारण ती ताकदीचा अभिनय करू शकली आहे. अक्षय कुमार, अनुमप खेर आणि सहकलावंतांचा अभिनय उत्तम झाला असून अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर या दोघांनीही ताकदीने भूमिका साकारल्या अन केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे. ७० टक्के कृषीप्रधान आणि गावखेड्यांत वसलेल्या भारतातील महिलांच्या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधणारा हा चित्रपट खेड्यांत विशेष लोकप्रिय होईल.

चित्रपटाचे दिग्दर्शन श्री नारायण सिंग यांनी उत्तम केले असून त्यांनी चित्रपटातील वास्तवतेला छेद जाणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली आहे. कलावंतांची निवड, पटकथेची मांडणी अचूक झाली आहे. चित्रपटातील संवाद हे सर्वात मोठे बलस्थान आहेत. चित्रपटात मोजकीच गाणी आहेत. आशयसंपन्न गाणी असली तरी ती फार लोकप्रिय होतील अशी नाहीत. पण, चित्रपटाला पुढे नेण्यात चांगली झाली आहेत.