ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चित्रपटावर टीका केल्यामुळे महिला पत्रकाराला बलात्काराची धमकी

चेन्नई, दि. १२ - तमिळ सुपरस्टार विजय याच्या एका चित्रपटावर टीका केल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी महिला पत्रकाराला बलात्काराची तक्रार केली. खुद्द या अभिनेत्यानेच हस्तक्षेप करून या पत्रकाराला विचार स्वातंत्र्य असल्याचे सांगितले असून चाहत्यांना शांत राहण्यास सांगितले आहे.

टीएनएम या संकेतस्थळाची संपादक धन्या राजेंद्रन हिने विजयच्या चित्रपटावर टीका केली होती. ‘जब हॅरी मेट सेजलया चित्रपटाचे परीक्षण करताना धन्या हिने त्याची तुलना विजयच्यासूराया चित्रपटाशी केली. हा चित्रपट एवढा कंटाळवाणा होता की मला उठून जावे लागले, असे तिने लिहिले होते.

त्यानंतर सोशल मीडियावरील विजयच्या चाहत्यांनी तिच्यावर टिकेचा भडीमारा केला. त्यांनी तिच्या लँडलाईन फोनवरही संपर्क साधून बलात्काराची धमकी दिली. हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून विजयने हस्तक्षेप केला. “मी महिलांचा आदर करणारा माणूस आहे. कोणालाही कोणाच्याही चित्रपटावर टीका करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही महिलेबाबत कोणत्याही कारणावरून घाणेरडे बोलता कामा नये, असे माझे मत आहे. कोणीही सोशल मीडियावर महिलांबाबत दुखावण्यासारखे चुकीचे मत मांडू नये,” असे त्याने सांगितले.

दरम्यान, धन्याने चेन्नई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिला अन्य पत्रकारांनी द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनीही पाठिंबा दिला आहे.