ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुस्लीम विवाह संस्थेवर भाष्य करणाऱ्या हलालचा टीझर रिलीज

मुंबई, दि. १६ - तलाकचा शस्त्रासारखा वापर करून मुस्लीम स्त्रियांचे जे भावनिक खच्चीकरण केली जाते त्याचे वेधक चित्रण मुस्लीम विवाह संस्थेवर भाष्य करणाऱ्या हलाल या चित्रपटात करण्यात आले आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर कलाकारांच्या तसेच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, समाजसेवक डॉ. बाबा आढाव, लेखक संजय पवार तसेच मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी या मान्यवरांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला. अमोल कागणे यांनी हलाल चित्रपटाची निर्मिती केली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांचे दिग्दर्शन असून येत्या २९ सप्टेंबरला लेखक राजन खान यांच्याहलालाकथेवर आधारितअमोल कागणे फिल्मस् प्रस्तुतहलाल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हा टीझर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजीवन अध्यन विस्तार विभाग, मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि हमीद दलवाई स्टडी सर्कल यांच्या सहयोगानेसामाजिक एकात्मतेचे विविध पैलूया विषयावर आयोजित चर्चासत्रा दरम्यान उपस्थित सर्वांना दाखवण्यात आला. निर्माते अमोल कागणे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, चित्रपटाने केवळ मनोरंजन करू नये तर समाजातील दु:, वेदना, व्यथा, शोषित वर्गाचे जगणे सुद्धा मांडणे गरजेचे आहे. या उद्देशानेच हलालची निर्मिती झाली आहे. हलाल चित्रपटानेही मुस्लीम स्त्रियांच्या व्यथा, वेदना मांडत वास्तववादी सामाजिक प्रश्नाला स्पर्श केला आहे.

हलाल मध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.