ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आता सिद्धूसोबत कपिलचा पंगा

मुंबई, दि. १६ - सध्या विनोदवीर कपिल शर्मा हा एका संकटातून बाहेर पडल्यानंतर लगेचच त्याच्यासमोर दुसरे संकट उभे असते. आता कपिल शर्मा नवीन वादात अडकला असून हा वाद नेमका ज्याच्यासोबत ज्यांनी त्याला पडत्या काळात मदत केली होती म्हणजेच त्याने चक्क नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत पंगा घेतला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवज्योत सिंग सिद्धू गेल्या काही काळापासून आजारी असल्यामुळे ते रविवारी चित्रीकरणाला हजर राहू शकले नाहीत. चित्रीकरणाला सिद्धू हजर राहू शकल्यामुळे त्या दिवसाचे चित्रीकरण तर रखडलेच शिवाय नंतर त्यांची खूर्चीही रिकामीच राहिली. आता शोचे चित्रीकरण सुरू करायचे म्हटल्यावर ती खुर्ची रिकामी कशी चालेल म्हणून कपिलने सिद्धू यांची परवानगी घेता त्या खुर्चीवर बसण्यासाठी सरळ अर्चना पुरण सिंहला साद घातली.

पण त्यानंतर ही बातमी सिद्धू यांना कळताच त्यांना खूप राग आला. कपिल आणि त्यांच्यात यावरून चांगलाच वाद झाला. सिद्धू यांना समजवण्याचा कपिलने खूप प्रयत्न केला. परंतु, ते काही समजण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेवटी सिद्धू यांच्या पुढे नमते घेत कपिलने अर्चनाला फोन करुन चित्रीकरणास येण्यास सांगितले. कपिलचे हे वागणे, त्यांना सांगता त्यांच्या ऐवजी पर्याय शोधणे यामुळे सिद्धू खूप नाराज झाले. आता सिद्धू यांची मनधरणी कपिल कशाप्रकारे करणारे हे मात्र कोणालाच माहित नाही.