ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सेल्फीच्या नादात तोल गेला, अभिनेत्याने लगावली कानाखाली

हैद्राबाद, दि. १७ (वृत्तसंस्था) - सेलिब्रेटी हा तर सर्वांसाठीच आवडता विषय त्यात आता तर सेल्फीचे फॅड जोमात वाढतेय ;पण एक सेल्फी काढणे तेही अभिनेत्यासोबत आणि गर्दीत हे किती महाग म्हणा अपमानास्पद ठरू शकते याचा कटू अनुभव आंध्रप्रदेशमध्ये एकाला मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.

आंध्रप्रदेशातील नंद्याल नावाच्या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून बालकृष्णा हा तिथला प्रसिद्ध अभिनेता आणि तेलगू देसम पक्षाचा आमदार प्रचारासाठी आला होता. त्याला हार घालून त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना एका चाहत्याचा तोल गेला आणि तो बालकृष्णाच्या अंगावर पडला. यामुळे भडकलेल्या बालकृष्णाने त्याच्या कानाखाली मारली. हा सगळा प्रकार झाल्यानंतरही त्याचे चाहते त्याचा जयजयकार करताना दिसत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.