ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

अक्षय कुमार देणार सुनील ग्रोवरला साथ

मुंबई, दि. १८ - कपिल शर्मा शोसुनील ग्रोवरने सोडल्यामुळे कपिल शर्माला आपला शो टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत तर दुसरीकडे लाइव्ह शो आणि पाहुण्या कलाकार होऊन सुनील जास्तीच मानधन घेत आहे. आता कपिलच्या डोकेदुखीत अजून एक भर पडणार असून कारण सुनील ग्रोव्हर लवकरच एक नवीन कॉमेडी शो घेऊन येत आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार लवकरच ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजया टिव्ही शोमध्ये छोट्या पडद्यावर येणार असल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे. आता सुनील ग्रोवर या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याचे म्हटले जात आहे. या शोचे सूत्रसंचालन सुरूवातीला एली अवराम करणार असल्याचे म्हटले जात होते. पण या शोच्या टीमने आता एलीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

या शोला सप्टेंबर महिन्यात सुरूवात होणार असल्यामुळे आता या शोमध्ये येण्यासाठी सुनील ग्रोवर पूर्णपणे तयार झाला आहे. अक्षय कुमार या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयसोबत या शोमध्ये जाखीर खान, मल्लिका दुआ आणि हुसैन दलालदेखील दिसतील.