ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

यंदा १५ वर्षांनंतर प्रथमच सल्लूभाईकडे बाप्पांचे आगमन नाही

मुंबई, दि. १९ - गेली १५ वर्षे बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमानखानच्या घरी मोठ्या धामधुमीत होणारे गणपतीबाप्पांचे आगमन यंदा होणार नसल्याचे समजते. त्या ऐवजी बाप्पा यंदा सलमानची बहीण अर्पिता हिच्या घरी विराजमान होणार आहेत. सध्या आबुधाबी येथे सलमान टायगर जिंदा है च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी तो मुंबईत नाही. त्यामुळे यंदा अर्प्रिताच्या घरी गणपती बसविला जाणार आहे. सलमान शूटिंगमधून वेळ काढून २५ ऑगस्टला १ दिवसासाठी अर्पिताकडे गणेश दर्शनासाठी येऊन जाणार आहे.

गतवर्षीही ट्यूबलाईटच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याने सलमान गणेशोत्सवात सहभागी होऊ शकला नव्हता. सलमानच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या घरात गणेशस्थापनेची सुरवात अर्पितामुळेच झाली. तिने आपल्या घरीही गणपती आणायचा असा हट्ट धरला व तेव्हापासून सलमानकडे गणेश स्थापना केली जाते. सलमानची स्वतःची गणेशावर पूर्ण श्रद्धा आहे. तो म्हणतो, माझ्यावर अनेक संकटे आली मात्र त्यातून मला गणपतीबाप्पानेच सुखरूप बाहेर काढले आहे.