ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कोकणात अवतरणार अमृता-अंकुशचे मेणाचे पुतळे

देवगड, दि. २१ - अमृता खानविलकर आणि अंकुश चौधरीसोबत तुम्ही कित्येकवेळा सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला असेल. पण त्यांच्या शेजारी असणाऱ्या गर्दीमुळे तुम्हाला कदाचित ते शक्य झाले नसेल किंवा त्यांच्याजवळ कसे पोहोचायचे हेच तुम्हाला माहिती नसेल. पण आता तुम्ही कधीही त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही पाहिजे तसा सेल्फी काढू शकता. कारण देवगड येथील वॅक्स म्युझियममध्ये आता महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता अंकुश चौधरी यांचे मेणाचे पुतळे साकारण्यात येणार आहेत. आज या पुतळ्यांचे अनावरण होणार आहे. अमृता आणि अंकुश यांचे मेणाचे पुतळे बनवण्याचे काम वॅक्स कलावंत सुनील कंडलूर यांनी हाती घेतले आहे.

लोणावळ्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सुनील सेलिब्रेटीज वॅक्स म्युझियम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे नव्याने सुरु झालेल्या वॅक्स म्युझियममध्ये सैराटफेम आर्ची आणि परशा (रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर) यांचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे यासैराटजोडीसोबत याआधीच अनेकांनी सेल्फी काढले आहेत.