ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रभासच्या ‘साहो’त तीन बॉलिवूड स्टार बनणार व्हिलन

मुंबई, दि. २३ - प्रभासचा भावबाहुबलीच्या यशानंतर चांगलाच वधारला आहे. आपल्या चित्रपटात प्रभास असावा यासाठी अनेक निर्माते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण सगळ्यात एका निर्मात्याने बाजी मारली असून प्रभास या चित्रपटात काम करणार हे जेव्हापासून निश्चित झाले होते, तेव्हापासूनच त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार याची चर्चा रंगली होती. अनेक अभिनेत्रींशी यासंबंधी चर्चा देखील केल्या गेल्या पण अखेरीस ही भूमिका अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या पदरी पडली.

आता अभिनेता फायनल झाला, त्यानंतर अभिनेत्री कोण असणार यावर शिक्कामोर्तब झाले आता या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत कोण दिसणार, हा नवा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हा एक अॅक्शनपॅक चित्रपट असल्यामुळे खलनायकाची भूमिकासुद्धा तेवढीच तगडी असणार यात काही शंका नाही. अभिनेते जॅकी श्रॉफ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असे आधीच कळले होते.

पण याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दोन नाही तर तब्बल तीन खलनायक या चित्रपटात असणार आहेत. जॅकी श्रॉफ यांच्याव्यतिरिक्त अभिनेता नील नितीन मुकेश आणि चंकी पांडे हे दोघेहीसाहोमध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.