ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

छोटा तैमूर करतोय बॉलीवूड डेब्यू

मुंबई, दि. २८ - करिना, सैफचा क्यूट तैमूर सध्याच लोकप्रियतेचा अनुभव घेत असून त्याचे बॉलीवूड पदार्पण लवकरच होत आहे. अर्थात आपल्या ममाबरोबरच तो बॉलीवूड सृष्टीत पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार करिनाबरोबर तो वीरे वेडींग चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले तेव्हा करिनाला तैमूरची चाहूल लागलेली नव्हती. मात्र शूटिंग दरम्यान तिला बाळाची चाहूल लांगली तेव्हा तिने निर्मात्यांना दोन ऑप्शन दिले. एकतर दुसरी अभिनेत्री घ्या किंवा बाळाचा जन्म हेाईपर्यंत शूटिंग थांबवा. हुषार निर्मात्यांनी तिसरा ऑप्शन दिला त्यांनी कथेत बदल करून प्रेग्नंट करिनाच त्यात दाखविली. आता तैमूर महिन्यांचा झाला आहे करिनाने या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले तेव्हा निर्मात्यांनी पुन्हा एकदा कथेला थोडा ट्वीस्ट देऊन तैमूरलाही चित्रपटात दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.