ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कपिल शर्मावर बॉलीवूडचा सिंघम कपिलवर वैतागला

मुंबई, दि. २९ - सध्या हास्य अभिनेता कपिल शर्माचे वाईट दिवस सुरू असून त्याचे कपिल शर्मा शोचे शूटींग सतत काहीना काही कारणाने रद्द होत असते. अजय देवगणसहबादशाहोच्या टिमलादेखील हाच अनुभव आला.

बादशाहोच्या टिमसोबत रविवारी कपिल शर्मा शोचे शूटींग होते. ठरल्या वेळेनुसार हे शूटींग साडे अकरा वाजता सुरू होणार होते. यासाठी एलियना डिक्रुझ आणि इशा गुप्ता सकाळी नऊ वाजता स्टुडिओत हजर झाल्या. अभिनेता इम्रान हाश्मी साडे दहा वाजता तर अजय देवगण ११ वाजता पोहोचला. पण कपिल शर्मा सेटवर हजर नव्हता. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन स्वीच ऑफ येत होता. ‘बादशाहोची टिम असा प्रकार घडल्यामुळे नाराज झाली आणि अखेर सेटवरुन अजयसह सर्व कलाकार निघून गेले. कपिल शर्माला पॅनिक अटॅक आल्याचे कपिलच्या टिमने सांगितले.

अनेक वेळा कपिल शर्मा आजारी असतो हे कारण सांगण्यात आले आहे. सध्या कपिल शर्मा शोच्या लोकप्रियतेला गळती लागली आहे. पूर्वीचे लोकप्रिय कलाकारदेखील सोबतीला नसल्यामुळे कपिल पुढील वाटचाल कशी करणार याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.