ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सोनी वाहिनीने बंद केले कपिल शर्माचे दुकान

मुंबई, दि. १ - गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सोनी वाहिनीच्या कार्यक्रमात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. वादग्रस्तपहरेदार पिया कीमालिका माहिती प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार बंद केल्यानंतर वाहिनीने आता कपिल शर्मा शोचे दुकान सुद्धा काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कपिलची तब्येत बरी नसल्याने काही सेलिब्रिटी त्याच्या सेटवरुन परतल्याच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. कपिलच्या शोचा एकही नवीन एपिसोड प्रसारित करण्यासाठी तयार नसल्याने वाहिनीला याचा फटका बसतो आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सुपर डान्सरहा रिअॅलिटी शो ड्रामा कंपनीच्या वेळेत प्रसारित होईल. तर ड्रामा कंपनीकपिलच्या शोच्या वेळेत प्रसारित करण्यात येईल.