ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

दमदार ‘बादशाहो’

मुंबई, दि. २ - कच्चे धागे’, ‘चोरी-चोरीआणिवन्स अपॉन टाइम इन मुंबईया चित्रपटात अजय देवगन सोबत काम करणारे दिग्दर्शक मिलन लुथरियाचा बादशाहो हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. मिलन लुथरियाचा अजय देवगणबरोबरचा हा चौथा चित्रपट असून या चित्रपटात अजय देवगन सोबतच सिरीयल किसर इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे.

आणीबाणीच्या काळातील (१९७५) घटनांवर आधारित चित्रपटाची कथा असून देशातील आणीबाणीच्या काळात राजस्थानमधील राजांचे खजाने जप्त केले जात होते. जयपूरची महाराणी गीतांजली देवी म्हणजे इलियाना डिकुजच्या महालावर त्याचदरम्यान छापा पडतो आणि सरकार तिचा खजाना जप्त करते. कारण सरकारला या खजान्याची माहिती दिलेली नसते. खजाना ट्रकमध्ये भरून दिल्लीला पाठवण्याचे काम पोलिस अधिकारी सहर उर्फ विद्युत जामवालला सोपवले जाते. तर महाराणी गीतांजली भवानी सिंह(अजय देवगण)ला भेटून याबाबत सांगते. भवानी महाराणीची नीकटवर्तीय संजना (ईशा गुप्ता), दलिया (इमरान हाश्मी), तिकला (संजय मिश्रा) बरोबर खजाना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच लुटण्याचा प्रयत्न करतात. त्याचदरम्यान अनेक गुपिते समोर येतात. पात्रांचे एकमेकांवर प्रेम, धोका, राग आणि असे अनेक ट्विस्ट्स पाहायला मिळतात. पण अखेर ट्रक दिल्लीला पोहोचू शकला की, रस्त्यातच लुटला गेला, हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला थिएटरच गाठावे लागेल.

चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी उत्तम केले आहे. चित्रपटाचे पूर्ण चित्रीकरण राजस्थानमध्ये झाले आहे. येथील राजवाड्यांच्या लोकेशनसाठी चांगला वापर करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा दुबळी वाटते. तिच्यावर आणखी काम करता आले असते. कथा फार हळू-हळू पुढे सरकते. त्यामुळे कंटाळा येण्याची शक्यता आहे. आजच्या तरुण वर्गाचा विचार करता चित्रपट मन लावून पाहिला जाण्याची शक्यता कमी आहे. अनेक पात्र असेही आहेत, ज्यांच्यावर अजून काम करता आले असते.

अजय देवगण आणि इलियानाने दमदार अभिनय केला आहे. त्याचबरोबर इमरान हाश्मीची वेगळी स्टाइल चित्रपटात पाहायला मिळाली आहे. सनी लिओनच्याट्रिपी-ट्रिपीआयटम साँगमध्ये त्याची एंट्री चांगली झालेली आहे Posted On: 02 September 2017