ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आणखी एका ठाकरे सदस्याची बॉलिवूडमध्ये एंट्री

मुंबई, दि. ४ - ठाकरे कुटुंबियातील एक सदस्य असलेल्या स्मिता ठाकरे या बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्मात्या आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता ठाकरे कुटुंबियातील सदस्याची बॉलीवूडमध्ये एंट्री होणार आहे. हि सदस्य आहे खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कन्या. दरम्यान राज ठाकरे यांनी आजवर आपल्या कुटुंबातील एकाही सदस्याला कधीही प्रसिद्धीच्या झोतात आणले नाही. पण लवकरच आता राज ठाकरे यांची उर्वशी ठाकरे हि आगामीजुडवा या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. या चित्रपटात तिनेजुडवा च्या सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली आहे.

ठाकरेविषयी दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना विचारले असता ते सांगताना, जेव्हा मी तिला पहिल्यांदाच भेटलो तेव्हा ती शूटदरम्यान इतरांशी मिसळून वागेल का, याबद्दल मला शंका होती. पण, तिने अत्यंत समर्पक वृत्तीने आपली जबाबदारी पार पाडली. ती खूपच मनमिळाऊ असून, लगेचच आमच्या टीमसोबत रूळली.

उर्वशीला तिच्या करिअरमध्ये आगामी काळात साजिद नाडियादवाला याला मार्गदर्शन करणार असल्याची चर्चा सिनेवर्तुळात फिरत आहे. ‘बागी या चित्रपटाशी तिचे नाव जोडले जात आहे. पण, त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्यापही समोर आली नाही. सध्यातरी उर्वशी तिच्या पहिल्या चित्रपटत साकारताना पाहून फारच आनंदात असल्याचे म्हटले जात आहे.