ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

संजय दत्तसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार राणी मुखर्जी

मुंबई, दि. ४ - आपल्या आगामी भूमी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बॉलीवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त हा व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत असल्यामुळे प्रमोशनमध्ये त्याला कोणत्याही गोष्टीची कसूर बाकी ठेवायची नाही. दरम्यान भूमी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधीपासूनच त्याच्याकडे अनेक चित्रपटांचे प्रस्ताव येऊ लागले होते. त्याला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी अनेक नावाजलेले दिग्दर्शक उत्सुक आहेत. पण आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवोदित दिग्दर्शक आरंभ कुमार याला त्याच्यामलंगया पहिल्या चित्रपटात संजय दत्तला घेण्याची इच्छा आहे. फक्त संजयच नाही तर राणी मुखर्जीनेही चित्रपटात काम करावे, अशी आरंभ कुमारची इच्छा आहे.

याबाबत माहिती देताना मलंग चित्रपटाचे सह-निर्माते संदीप कुमार यांनी सांगितले की, या चित्रपटातील नायिकेच्या व्यक्तिरेखेसाठी आम्ही राणीला विचारले आहे. राणी हि आमच्या प्रत्येक चित्रपटात असावी असेच मला वाटते. कारण राणीसारखी अभिनेत्री सिनेसृष्टीत शोधून सापडणार नाही. तिची जोडी संजयसोबत फार उठून दिसेल. पण अद्याप राणी मुखर्जीकडून या चित्रपटासाठी होकार आल्यामुळे प्रेक्षकांना संजय आणि राणीची ऑनस्क्रीन केमेस्ट्री पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.