ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रेस ३ मध्ये झळकणार सलमान

मुंबई, दि. ५ - आपण आतापर्यंत आलेला रेस सिरीजमधील चित्रपटात सैफ आली खान याला पाहिले होते. त्यामुळे रेस हा चित्रपट आणि सैफ जणूकाही समीकरणच जुळून आले होते. पण आता या चित्रपटात एका नवा ट्विस्ट आला आहे. तो म्हणजे सलमान खान. कारण या चित्रपटात म्हणजेच रेस 3मध्ये आता सैफच्या जागी सलमानची वर्णी लागली असल्याचे जवळपास नक्कीच झाले आहे.

दरम्यान याबाबत सैफ अली खान याच्याशी त्याच्या आगामी शेफ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी संवाद साधला असता तो म्हणाला की, रेससाठी सलमानशिवाय दुसरा कोणताच अभिनेता योग्य वाटला नसता. चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सलमानला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. निर्मात्यांनीरेसच्या तिसऱ्या भागात सैफला डावलून सलमानला घेण्याचा निर्णय का घेतला असावा, हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

या संदर्भातील वृत्तमुंबई मिररया वृत्तपत्राने प्रसिद्ध केले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या नावावर निर्माते रमेश तौरानी यांनी या चित्रपटासाठी मोहर लगावली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसोझा करणार आहे.