ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दयाची कमाई वाचून व्हाल हैराण

मुंबई, दि. ६ - सीआयडीमालिकेतील दरवाजे तोडण्याच्या खास स्टंटसाठी इन्स्पेक्टर म्हणजेच दयानंद शेट्टी लोकप्रिय आहे. या मालिकेत एसीपी प्रद्युमनला जेव्हाही गुन्हेगाराला शोधण्यासाठी कुठे जायचे असटे, तिथे दरवाजा तोडण्यासाठी दया हा त्यांची पहिली पसंत असतो. एकीकडे भलेही त्यांना मोठे आणि चांगले रोल ऑफर होत नसले तरी, या कलाकाराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या दोन दशकांपासून दया म्हणजेच दयानंद शेट्टी हा अभिनेतासीआयडीमध्ये काम करतो आहे. तो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लोकप्रिय आहे. पण त्याच्यावर सीआयडीचा शिक्का बसला आहे. त्याची ओळख त्यापेक्षा अधिक आहे. पण त्याकडे फारसे कुणी लक्षच देत नाही. दयानंद हा ॅक्टींगमध्ये येण्याआधी एक स्पोर्टमन होता हे बहुतेकांना माहितीच नाही. दयानंदला पायात झालेल्या जखमेमुळे खेळ सोडावा लागला. दयानंद हा शॉट पुट आणि डिस्कस थ्रोअर होता. या खेळात त्याने अनेक पारितोषिकेही मिळवली आहेत.

तो १९९४ मध्ये महाराष्ट्रातून डिस्कस थ्रो या खेळाचा चॅम्पियन बनला. त्यानंतर त्याने सीआयडी या मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि त्यात निवडला गेला. या शोच्या माध्यमातून केवळ दया नाही तर इतरही कलाकारांना वेगळ्या उंचीवर जाण्याची संधी मिळाली. एवढ्या वर्षांपासून दया ही मालिका करतो आहे. त्यामुळे सहाजिकच त्याच्या चाहत्याना दया किंवा या मालिकेतील कलाकार किती पैसे कमवतात याची उत्सुकता लागलेली असते.

दया या मालिकेसाठी किती पैसे घेतो याची माहिती इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. दयानंद शेट्टी हा या माहितीनुसार मालिकेसाठी दिवसाला लाख रूपयाचे मानधन घेतो. म्हणजे दया जर महिनाभर काम करत असेल तर तो महिन्याला ३० लाख रूपये या मालिकेतून कमावत असेल. केवळ सीआयडी मालिकेची त्याची ही कमाई आहे. इतर कामांमधून तो वेगळी कमाई करतो. दयाने आतापर्यंतसिंघम रिटर्न्स’, ‘जॉनी गद्दारआणिरनवेसारख्या चित्रपटातही काम केले आहे.