ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दाक्षिणात्य सोलो मध्ये झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर

मुंबई, दि. ७ - सई ताम्हणकरला मराठी चित्रपटांना ग्लॅमर प्राप्त करून देणारी तसेच भूमिकांमध्ये निर्भीडपणे नवनवे प्रयोग करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सई फक्त मराठी चित्रपटापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तिने आपली अभिनय संपन्नता दुनियादारी, तू ही रे, प्यारवाली लव्हस्टोरी, जाऊ द्याना बाळासाहेब, नो एंट्री पुढे धोका आहे, पुणे ५२, वजनदार सारख्या असंख्य मराठी चित्रपटांमधून सिद्ध केली आहे. तिने आमिर खान अभिनितगजनीद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिच्याहंटरया हिंदी चित्रपटातील भूमिकेलाही प्रेक्षकांनी पसंती दिली.

भूमिकेच्या लांबीला महत्व देता चांगला रोल महत्वाचा असे मानत आल्यामुळे ती आता दाक्षिणात्य चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्याळम आणि तामिळ भाषेत बनत असलेल्यासोलोया चित्रपटात सईसतीनामक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बिजॉय नम्बियार यानेसोलोया चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट सुरुवातीला फक्त मल्याळम भाषेत बनणार होता परंतु नंतर तामिळमधेही शूट करण्याचे ठरले. चित्रपटाची कहाणी निवडक वेचककथा असून चार वेगवेगळ्या व्यक्तींची असून चार मूलघटकांवर, म्हणजे पृथ्वी/रुद्र, अग्नी, वायू आणि जल यावर केंद्रित असून ती नंतर एकत्रितपणे बांधली जाते.

सोलोचित्रपट रोमँटिक थ्रिलर असून बिजॉय नम्बियार अब्राहाम मॅथ्यू बरोबर मल्याळम आणि अनिल जैन बरोबर तामिळ भागांची निर्मिती करीत आहे. दलकीर सलमान, नेहा शर्मा, दिनो मोरिया, श्रुती हरिहरन, साई धनिका, दीप्ती सती, सतीश, जॉन विजय, मनोज जयन आणि सई ताम्हणकर यांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘सोलोचित्रपट मल्याळम आणि तामिळ भाषेत प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांची सुपरस्टार सई ताम्हणकरचे आता दाक्षिणात्य फॅन्स पण असतील एवढे मात्र नक्की