ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

संघ म्हणजे रिमोट कंट्रोल नव्हे!

दिल्लीत रा. स्व. संघाची अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांनी अशा बैठकीला जावे का? संघाच्या बैठकीत निवेदन करणे हे घटनाबाह्य होत नाही का? वगैरे मुद्दे उपस्थित करण्यात आले. या मुद्द्यांची उत्तरे शोधण्यापूर्वी ही बैठक समजून घेणे आवश्यक आहे.

संघात समन्वय बैठकीची संकल्पना आणीबाणीनंतर आली. आणीबाणीनंतर जनता सरकारात संघ स्वयंसेवक मंत्री झाले. संघाची वाढ फार वेगाने झाली. विविध क्षेत्रांतील कामेही वाढू लागली. सर्व संस्था एका विचार परिवारातील असल्यामुळे त्यांच्यात आपापसात समन्वय असणे फार आवश्यक झाले. संघ ही मातृसंस्था असल्यामुळे अशा बैठका बोलावण्याची जबाबदारी संघावर येऊ लागली. या बैठका जिल्हास्तरापासून ते अखिल भारतीय स्तरापर्यंत होऊ लागल्या.
मी दीर्घकाळ मुंबईचा सहकार्यवाह होतो. मुंबईच्या समन्वय बैठकीत राम नाईक, हशू अडवाणी आदी कार्यकर्ते असत. युतीचे शासन होते, तेव्हा प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, नितीन गडकरी असत. आताही गेल्या महिन्यात औरंगाबादला अशी बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. जिल्हा विभाग स्तराच्या बैठकीला आमदार, खासदार उपस्थित असतात.