ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कुटुंब सांभाळू शकते, तर प्रभाग का नाही? - पौर्णिमा सोनवणे

प्रभाग क्र. 1 (अ) - रुपीनगर, तळवडे ठळक कामं - 

> रुपी हौसिंग सोसायटीचा 15 वर्षे प्रलंबित पाण्याचा प्रश्‍न सोडवला.
> जुन्या, नादुरुस्त पाईप लाईन्स बदलल्या.
> महिलांना 500 शिलाई मशिनचं वाटप.
> विधवा-निराधार महिलांना आर्थिक मदत.
> प्रभागातील बकालपणा दूर केला.
> स्व. डॉ. गोसावी सार्वजनिक वाचनालय व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची उभारणी.
> श्री. सिद्धीविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार.
> कै. शंकरराव बारकोजी देशमुख प्राथमिक आरोग्य केंद्राचा आरंभ.

वर्षभरातील प्रस्तावित कामं-
> तळवडे, रुपीनगरमधील रस्त्यांचं डांबरीकरण करणार.
> जलवाहिनी तसेच पदपथ दुरुस्तीची कामं करणार.
> स्मशानभूमीत सर्व सुविधा पुरवणार.
> रस्त्यावरची भाजी मंडई हटवून त्यासाठी स्वतंत्र सोय करणार.
> महिलांच्या उन्नतीसाठी सर्वंकष प्रयत्न करणार.

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) - महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करताना दिसत आहेत. विविध क्षेत्रांत त्यांचा लिलया वावर सुरू आहे. आपलं अस्तित्व सिद्ध करण्यात महिला बर्‍याच अंशी यशस्वीही झालेल्या दिसतात. स्वत:ची स्वतंत्र ओळख त्या निर्माण करताना दिसतात. अर्थातच यामागे त्यांच्या कुटुंबियांचा भक्कम पाठींबा असतो, हे कुणीही नाकारू शकणार नाही. राजकारणासारख्या पुरुषबहुल क्षेत्रातही महिलांनी स्वत:ला सिद्ध करुन दाखवलंय. महिलांची क्षमता ओळखणाऱ्या  दिग्गज नेते शरद पवार यांनी त्यामुळेच तर त्यांना राजकारणात 50 टक्के आरक्षण दिलंय. याचाच लाभ घेत अनेक महिलांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं. पौर्णिमा सोनवणे यादेखील पवार साहेबांच्या या दृढ विश्वासाला सार्थ ठरवत राजकारणात उतरल्या. आपलं काम, आपली जबाबदारी 100 टक्के पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या प्रभाग क्र. 1 रुपीनगरच्या नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांची ही मुलाखत.

केबी9 न्यूजवर आयोजित विकासकामांचा लेखाजोखा या मालिकेतील पहिली मुलाखत द्यायला त्या आल्या तेव्हाच पौर्णिमाताईंचा साधेपणा लक्ष वेधून घेत होता. अत्यंत साधं राहणीमान, प्रत्येक प्रश्‍नाचं विचारपूर्वक उत्तर देणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला प्रभाग म्हणजे आपलं कुटुंब समजून त्यातील समस्या सोडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणं... या पौर्णिमाताईंच्या वैशिष्ट्यांमुळे त्या सहजच कोणातही मिसळतात. आपण नगरसेविका आहोत, याचा कोणताही दंभ जाणवू न देता प्रभागाची सेवा करणे हीच आपली जबाबदारी असल्याचं त्या सांगतात.

पौर्णिमाताई सोनवणे या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या. नगरसेविकेचं घर आहे, असं कुणी सांगितलं तरी विश्‍वास बसणार नाही, अशा अतिशय लहान, साध्या घरात राहतात. त्यांचे पती रवींद्र (अप्पा) सोनवणे गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. 2007 साली त्यांनी नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली. पण ते निवडून येऊ शकले नाहीत. 2012 साली माजी आ. विलास लांडे यांनी पौर्णिमाताईंना निवडणुकीला उभं राहण्यासाठी पाठिंबा दिला तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांना तिकीट दिलं. रवींद्र (अप्पा) सोनवणे यांच्या पूर्वकामांची पुण्याई, त्यांच्या कुटुंबाबद्दलचा दृढ विश्वास यामुळे पौर्णिमाताई निवडून आल्या. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर पतींची मोलाची साथ, मार्गदर्शन याचबरोबर सासूबाईंचा भक्कम पाठींबा या जोरावर पौर्णिमाताई आपल्या प्रभागात जोमाने काम करू शकल्या. याबाबत त्या जाहीरपणे सांगतातही. सासूबाईंनी खूप सांभाळून घेतलं, असं सांगताना त्या गहिवरतात.

समाजकारणाचा वसा कुटुंबातूनच घेऊन आलेल्या पौर्णिमाताईंचे आदर्श आहेत, सावित्रीबाई फुले. ज्योतीबा फुलेंना मनापासून प्रत्येक कार्यात साथ देणार्‍या सावित्रीबाईंसारखंच आपल्याला काम करायचंय असं त्या म्हणतात. नगरसेविका म्हणून काम करताना त्यांना आपल्या प्रभागात असलेल्या मूलभूत सुविधांच्या वानवेची जाणीव होतीच. त्यामुळे कामाची सुरुवातच प्रभागातील स्वच्छतेपासून केली. रस्ते, वीज, पाणी, पदपथं, गटारं या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. महिलांसाठी काहीतरी करण्याची तळमळ होतीच. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या असलेल्या पौर्णिमाताईंनी याचा अचूक लाभ घेतला. 

महिलांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत, त्याबाबत महिलांना जागरुक केलं पाहिजे, या भावनेने त्यांनी बहुतांश योजना आपल्या प्रभागातील महिलांपर्यंत पोहोचवल्या. त्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून दिला. शिलाई मशिनचं वाटप, विधवा-निराधार महिलांना आर्थिक सहाय्य, युवतींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळवून दिलं. त्याचप्रमाणे परिचारिका, रुग्णसेविका, केटरिंग, ब्युटी पार्लर अशा विविध कोर्सेस उपलब्ध करुन दिले. याचा लाभ प्रभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर घेतला, असे पौर्णिमाताई सांगतात. पौर्णिमाताईंचा कामाचा झपाटा आणि लोकांचा त्यांच्यावरील विश्वास पाहून ज्येष्ठ नेते अजित पवारांनी त्यांना अ आणि फ प्रभागाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ताई ती जबाबदारीदेखील तितक्याच आत्मीयतेने पार पाडत आहेत.

काम करत असताना चांगले-वाईट अनुभव येतातच. पौर्णिमाताई देखील याला अपवाद नाहीत. त्यांना महापालिकेतून काहींचा पाठींबा मिळाला तर काहींचा विरोधही. प्रभागात काम करत असताना त्यांना सुजाण नागरिकांनी चांगले सहकार्य केले तर काहीठिकाणी नागरिकांचा रोषही ओढावून घ्यावा लागला. प्रभागातील कामं रेडझोनमुळे लवकर होत नाहीत, याची जाणीव पौर्णिमाताईंबरोबरच नागरिकांनाही आहे. त्यामुळेच ते त्यांना पूर्ण सहकार्य करतात. होता होईल तितकी कामे त्या पूर्ण करतातच. येत्या वर्षभरात प्रलंबित कामं पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास आहे. एक महिला कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकते तर प्रभाग का नाही? असा प्रतिप्रश्‍न करणार्‍या पौर्णिमाताईंचा आत्मविश्वास त्यातून झळकतो. या आत्मविश्वासाच्या जोरावर त्या प्रभागातील समस्यांचा निकाल लावतील, अशी आशा ठेवूयात.