ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

विकासकामं करणं हे नगरसेवकाचं कर्तव्यच! - शांताराम भालेकर

प्रभाग क्र. 1 (ब) - रुपीनगर, तळवडे 

ठळक कामं - 
> इन्फ्राच्या माध्यमातून 100 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन.
> प्रभागातील जुन्या, नादुरुस्त पाईप लाईन्स बदलल्या.
> शहरातील पहिली मनपा आदर्श पर्यावरणपूरक शाळा सुरू केली.
> बचतगट महासंघाद्वारे 100 बचतगटांना अनुदान मिळवून दिलं.
> तळवडे-रुपीनगर भागात ड्रेनेजलाईन नव्याने घालून दिली.
> युवकांसाठी व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू केलं.
> विधवा-निराधार महिलांना आर्थिक मदत मिळूवन दिली.
> स्मशानभूमीत अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

वर्षभरातील प्रस्तावित कामं-
> डिअर सफारी पार्क उभारणार.
> तळवडे आयटी सेक्टरमध्ये अग्निशामक केंद्र उभारणार.
> चिखली, तळवडे, स्पाईन ही रस्त्याची प्रलंबित कामं पूर्ण करणार.
> वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते दुरुस्त करणार.
> बचतगटांद्वारे महिलांचे सबलीकरण करणार.

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) - कोणतंही काम यशस्वी करायचं असेल तर त्यात त्या व्यक्तीने 100 टक्के जीव ओतला पाहिजे. त्या कामाबाबत त्या व्यक्तीला मनापासून तळमळ पाहिजे. तसं पाहता, एखाद्या क्षेत्रात काम करायचं असं सर्वजणंच ठरवतात. पण त्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तशी मेहनतही घेतली पाहिजे. जिद्द, तळमळ, ध्यास ही त्रिसूत्री जिथे मिळते, तिथे हमखास यश मिळतंच. ही त्रिसूत्री अवलंबून यशस्वी होणार्‍या काही मोजक्या नगरसेवकांपैकी एक म्हणजे शांताराम कोंडिबा उर्फ बापू भालेकर! प्रभाग क्र. 1 (ब) रुपीनगर, तळवडे भागातील विकासकामांचं खणखणीत नाणं बापू वाजवून दाखवतात. प्रभागातील 100 टक्के कामं पूर्ण झाली नसली तरी लोकांनी आपल्याला निवडून दिलंय, त्यामुळे विकासकामं करणं हे आपलं कर्तव्यच आहे, असं अगदी स्पष्टपणे सांगणार्‍या बापूंचा प्रांजळपणाच बहुदा नागरिकांना भावतो. आणि त्यामुळेच की काय, ते दोनदा त्याच प्रभागातून निवडून आले आहेत.

केबी9 न्यूजवर आयोजित विकासकामांचा लेखाजोखा या मालिकेतील दुसरी मुलाखत झाली, नगरसेवक शांताराम उर्फ बापू भालेकर यांची. त्यांच्या निवासस्थानी अत्यंत मनमोकळेपणाने साधलेल्या या संवादातून बापूंनी आपल्या राजकीय प्रवासाचे अचूक वर्णन केले. महाविद्यालयीन जीवनात असताना मौजमजा करणं हे तर प्रत्येक तरुण-तरुणींचं आवडतं काम असतं. पण शांतारामबापूंना या काळातच समाजातील दु:ख, दैन्याची जाण झाली. समाजातील प्रत्येक व्यक्तीचं दु:ख आपण दूर करू शकत नाही. पण किमान त्यांच्या दु:खावर फुंकर तरी घालू शकू, या एका विचाराने ते समाजकार्याकडे वळले. संघवी केशरी महाविद्यालयातच समाजकार्य तसेच राजकारणाची पाळंमुळं रोवू लागली. समाजकार्य करायचं असेल आणि त्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर राजकीय क्षेत्रात पाय रोवणं ओघानं आलंच. त्यामुळेच शांतारामबापूंनी महापालिकेची निवडणूक लढवली. 2007 साली ते निवडून आले. लोकांचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत त्यांनी तळमळीने कामं केली. त्यामुळे 2012 सालीही त्यांनाच लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं. ही त्यांच्या कामाचीच पावती!

तळवडे भागात बहुतांश मोठ्या आयटी कंपन्या तसेच लघु उद्योग आहेत. या कंपनीत आणि महापालिकेत एक समन्वयक म्हणूनही शांतारामबापूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्रिवेणीनगर-तळवडे हा 24 मीटरचा रस्ता केल्यामुळे या भागात मोठ्या आयटी कंपन्यांची वर्दळ वाढली. बापूंची दूरदृष्टी इथे कामी आली. येथील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्रिवेणीनगर-तळवडे, चिखली-तळवडे, चिखली- स्पाईनरोड अशी रस्त्यांची कामं सध्या सुरू केली आहेत. महापालिकेतील अधिकार्‍यांच्या तसेच स्थानिक आमदारांच्या सहकार्यामुळेच इन्फ्राच्या माध्यमातून 100 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले. याचेही श्रेय बापूंच्या धडाडीलाच जाते! 

तळवडे, रुपीनगर भागात ड्रेनेजलाईन, रस्त्यांची दुरुस्ती, जलवाहिनी, वीज व्यवस्था सुरळीत करण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. प्रभागात युवावर्गासाठी व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रही सुरू करण्यात आले आहे. विधवा-निराधार महिलांना आर्थिक मदत मिळवून देणं, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आर्थिक अनुदान मिळवून देणं या कामांबरोबरच महिलांना बचतगटाच्या माध्यमातून सबल करणं हा उद्देश ठेवून बापूंनी 100 बचतगटांना अनुदान मिळवून दिलं. अर्थातच या कामात त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताईंची मोलाची साथ त्यांना मिळाली. 

बापूंना सुरुवातीपासूनच शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी वेगळं काम करायचं होतं. तळवडे भागातील महापालिकेच्या शाळेचा कायापालट त्यांनी या जिद्दीतूनच करुन दाखवलं. या शाळेत सौरउर्जेवर चालणारी उपकरणे वापरुन पर्यावरणपूरक बाबींचा समावेश करण्यात आला. तरंगती बाग, 50 वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची लागवड केलेल्या या शाळेतर्फे महापालिकेला 1000 रोपवाटिका विद्यार्थ्यांनीच दिल्या. या भागातील गोरगरीब विद्यार्थी या शाळेत शिकतात. साधारण 350 विद्यार्थी शिकत असलेल्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे इथले 4-5 विद्यार्थी दरवर्षी नवोदय शाळेसाठी निवडले जातात! या शाळेनं महापालिकेचा स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक शाळा म्हणून 2008 साली पुरस्कारही मिळवलाय. यामागे शांतारामबापूंची तळमळ आणि मेहनत अधोरेखित होते.

शांतारामबापू म्हणतात, नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना ताण येतोच. पण हे पद स्विकारलेलं असतं, लोकांनी विश्वास टाकलेला असतो, केवळ यासाठीच नव्हे तर लोकांची सेवा करणे हे आपले कर्तव्य असते, म्हणून काम करायचं असतं! स्विकारलेलं काम 100 टक्के पूर्ण करणं, हे माझं कर्तव्यच आहे. अर्थातच सगळीच्या सगळी कामं एकटा माणूस पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे सगळी अपेक्षापूर्ती माझ्याकडून होऊ शकत नाही. पण जितकं माझ्याने शक्य आहे, तितकं काम मी करणारच.  

येत्या वर्षभरात अनेक कामांचं नियोजन आहे. त्यात आयटी भागात अग्निशामक केंद्र सुरू करणं, निघोजे, सावरदरी, शिंदेवासुली या रस्त्यांची दुरुस्ती अशी कामं करायची आहेत. त्यातही डिअर सफारी पार्क करणं ही माझी महत्त्वकांक्षा आहे, त्यामुळे या कामाला मी प्रथम प्राधान्य देईन, असं शांतारामबापू म्हणतात. सगळ्या क्षेत्रातील अचूक जाण, नागरिकांशी सुसंवाद आणि काम पूर्णत्वाला नेण्याची जिद्द बाळगणारे शांतारामबापू भालेकर त्यांच्या प्रभागात आपल्या विकासकामांचं नाणं आणखी खणखणीत वाजवतील, यात शंका नाही!