ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

समन्वयातून प्रश्न सोडविण्यावर भर दिला! - सुरेश म्हेत्रे

प्रभाग क्र. २ (अ) चिखली

ठळक कामे -

> प्रभागातील उद्यानाचं अद्ययावत सोयींनी नूतनीकरण केलं.

> रुपीनगरातील जलवाहिनीचं काम पूर्ण केलं.

> महापालिकेचा दवाखाना सुरू केला. दर आठवड्याला लसीकरण सुरू केलं.

> डांबरीकरण, सिमेंट ब्लॉकची कामं केली.

> पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी सेंट्रलाईज वाहिनी सुरू केली.

 

वर्षभरातील प्रस्तावित कामं -

> डीपी रस्त्याची कामं पूर्ण करणार.

> रेड झोन हटवण्यासाठी पाठपुरावा करणार.

> रुपीनगर, त्रिवेणीनगर, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्तीत महापारेषणकडून 8 टॉवरची उभारणी सुरू.

> महावितरणतर्फे भूमिगत इलेक्ट्रीसिटीचे काम सुरू.


पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) - काम करताना तुम्ही कोणत्या पक्षाशी बांधिल आहात, किंवा कोणत्या राजकीय नेत्याचा वरदहस्त तुमच्यावर आहे, हे तितकंसं महत्त्वाचं ठरत नाही. तुम्ही काम कसे करता किंवा तुमची तुमच्या कामाप्रति काय निष्ठा आहे, हे जास्त महत्त्वाचं! यामुळेच की काय, चिखली प्रभाग क्र. 2 (अ) चे नगरसेवक सुरेश रंगनाथ म्हेत्रे यांना नागरिकांनी निवडून दिलं. त्यांच्या कामाची यापेक्षा दुसरी पावती ती काय? एखाद्या पक्षाच्या झेंड्याखाली काम करणं वेगळं आणि स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून काम करणं वेगळं! उलट अपक्ष म्हणून काम करताना कोणतंही दडपण जाणवत नाही, तुम्ही मोकळेपणाने आपलं कर्तव्य पार पाडू शकता, असं म्हेत्रे म्हणतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रभागातील दुसर्‍या नगरसेविकेबरोबर त्यांचं उत्तम समन्वय आहे. या समन्वयातूनच प्रभागातील बहुतांश कामं पूर्ण केल्याची प्रांजळ कबुली म्हेत्रे यांनी केबी9 न्यूजच्या कार्यक्रमात दिली.


केबी9 न्यूजवर आयोजित विकासकामांचा लेखाजोखा या मालिकेतील तिसरी मुलाखत झाली, नगरसेवक सुरेश रंगनाथ म्हेत्रे यांची. खरं तर सहसा आपल्या प्रभागातील दुसर्‍या नगरसेवकाबद्दल खूप चांगलं बोललं जात नाही. असं असताना कोणत्याही कामाचं श्रेय केवळ स्वत:कडे न घेता समन्वयामुळेच ही कामं झाल्याची कबुली देणारे म्हेत्रे हे नगरसेवकांसाठी आदर्श उदाहरणच ठरावेत! त्यांच्याच प्रभागातील नगरसेविका भालेकर ताई यांच्याबरोबर ते नेहमी चर्चा करतात आणि मग निर्णय घेऊन कामं करतात. अर्थात या त्यांच्या तळमळीमागे त्यांच्या प्रभागातील नागरिकांचाही त्यांच्यावरील प्रचंड विश्वास महत्त्वाचा ठरतो. ते म्हणतात, आम्ही अपक्ष असतानाही लोकांनी आम्हाला निवडून दिलं ही फार मोठी जबाबदारी आहे. केवळ प्रभागाचा विकास करतील, या विश्वासापोटीच लोकांनी मला निवडून दिलं, त्यामुळे प्रभागाचा विकास करण्याबरोबरच त्यांचा विश्वास कायम करणं हेदेखील माझं आद्य कर्तव्य आहे.

 

म्हेत्रे यांच्या घराण्यालाच राजकीय तसेच सामाजिक कार्याची पार्श्वभूमी आहे. त्यांचे बंधू कै. गजानन म्हेत्रे चिखलीचे उपसरपंच होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सुरेश म्हेत्रे यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी कामं सुरू केली. 2007 साली म्हेत्रे निवडणुकीला उभे राहिले, पण थोडक्या मतांनी पराभूत झाले. पण त्यांनी आपली समाजोपयोगी कामं सुरूच ठेवली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीसह अनेक पक्षांकडे तिकिटासाठी विचारणा केली. पण उपयोग झाला नाही. शेवटी अपक्ष म्हणून ते निवडणुकीत उभे राहिले, आणि 2012 साली नगरसेवकपद त्यांच्याकडे आलं. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या दडपणाशिवाय मोकळेपणाने आणि जोमाने त्यांची कामं करू लागले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्रभागातील दुसर्‍या नगरसेविकेशी सातत्याने चर्चा करून, समन्वयाने आणि समजुतीने त्यांनी प्रभागातील कामे सुरू केली. लोकांनी त्यांच्या या भूमिकेचेही मनापासून स्वागत केले. केवळ याच वैशिष्ट्यामुळे प्रभाग क्र. 2 मधील अनेक प्रलंबित कामे झटपट पूर्ण झाली.

 

म्हेत्रे म्हणतात, रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्‍न तर मुलभूत आहेच, ती सोडवणे नगरसेवकांचे कर्तव्यच आहे. पण याशिवाय लोकांच्या जिव्हाळ्याचे काही प्रश्‍नं असतात. ती प्राधान्याने सोडवणे गरजेचे असते. म्हेत्रे यांना तांत्रिक माहिती जास्त असल्यामुळेच महावितरणतर्फे भूमिगत वीजवाहिनीची कामं 90 टक्के पूर्ण झाली आहेत. येत्या दोन महिन्यात ही कामं 100 टक्के पूर्ण होणार. या परिसरात ओव्हरहेड वायरींचा मोठा धोका आहे. त्यामुळे 2012 पासून महापारेषणशी सातत्याने संपर्क साधून 5 कोटी 75 लाख रुपयांची कामं मंजूर करून घेतली. त्रिवेणीनगर, रुपीनगर, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती इथं 220 केबीच्या 8 टॉवर्सची उभारणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता तिथे मोठा धोका टळला. डांबरीकरण, सिमेंट ब्लॉकची कामंही सुरू केली आहेत. पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्या सेंट्रलाईज करून घेतल्या. काही परिसरातील 10 टक्के ड्रेनेजची कामं राहिली आहेत, तीही या 5-6 महिन्यात पूर्ण होतील. डीपी रस्त्याची कामे सुरू आहेत. तिथल्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न आहे. या डीपी रस्त्यांसाठी 2 कोटींची तरतूद आहे. स्पाईन रस्त्यासंदर्भात 16 कोटी 53 लाख रु. मनपाने प्राधिकरणाला दिले.

 

रेड झोन हा या प्रभागातला मुख्य व प्रलंबित प्रश्‍न आहे. रेड झोन हटवण्यासाठी रेडझोन संघर्ष कृती समितीतर्फे निगडीत प्रभागातील नागरिकांनी भव्य मोर्चा काढला होता. म्हेत्रे यांचा स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्याकडे सातत्याने या प्रश्‍नासाठी पाठपुरावा सुरू आहे. रेड झोनमुळे या भागातील अनेक समस्या तशाच राहिल्या आहेत. रेड झोन हटला की आम्ही आमच्या प्रभागात अक्षरश: दिवाळी साजरी करणार आहोत, या म्हेत्रेंच्या वाक्यावरुनच येथील प्रश्‍नांची तीव्रता लक्षात यावी. कोणताही पक्ष आपल्या पाठीशी नसला तरी आम्ही यावेळेसही पुन्हा अपक्ष म्हणून निवडून येऊन असा आत्मविश्वास म्हेत्रे यांना वाटतो. त्यांची आजवरची कामं पाहता हा विश्वास खरा ठरेल, असे म्हटल्यास काही वावगे नाही!