ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पक्षापेक्षा लोकांचा आमच्यावरील विश्वास महत्त्वाचा! - नगरसेविका अरुणा भालेकर

प्रभाग क्र. २ (ब) - त्रिवेणीनगर, रुपीनगर, तळवडे.

ठळक कामं- 
0 प्रभागातील उद्यानात अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या.
0 विधवा-निराधार महिलांना आर्थिक मदत मिळवून दिली. 
0 हुशार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली.
0 गरीब महिलांना शिलाई मशिनचं वाटप केलं.
0 बचतगटाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण केलं.
0 रुपीनगरातील जलवाहिनीचं काम पूर्ण केलं.
0 महापालिकेचा दवाखाना सुरू केला. 
0 डांबरीकरण, सिमेंट ब्लॉकची कामं केली.
0 प्रभागातील उघड्या गटारी बंद केल्या.

वर्षभरातील प्रस्तावित कामं-
0 डीपी रस्त्याची कामं पूर्ण करणार.
0 रेड झोन हटवण्यासाठी पाठपुरावा करणार.
0 रुपीनगर, त्रिवेणीनगर, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्तीत महापारेषणकडून 8 टॉवरची उभारणी सुरू.
0 महिलांसाठीच्या योजना तळागाळात पोहोचवणार.
0 बचतगटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करणार.

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी)- राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षाच्या झेंड्याखाली काम करता, यावर बरंच काही अवलंबून असतं. तुम्ही एखाद्या पक्षाकडून निवडून येत असाल तर तुमची सरकारदरबारी कामं पटापट होणं, पक्षांतर्गत तुमच्या कामांची दखल घेणं किंवा तुमच्या कामांकडे दुर्लक्ष करणं, पक्षवाढीसाठी तुमच्याकडून अपेक्षा ठेवणं, पक्षनेत्यांच्या दबावाखाली कामं करणं, वगैरे साधक-बाधक गोष्टींना सामोरं जावं लागतं.  पण जर तुम्ही अपक्ष म्हणून निवडून येता आणि केवळ लोकांच्या विश्वासावर तुमचं पद विसंबून असतं तर तुमची जबाबदारी आणखी जास्त वाढते. कारण ज्यांच्या मतांवर तुम्ही निवडून आलेले असता, त्यांच्याप्रति तुमची जबाबदारी असतेच, पण प्राधान्याने त्यांच्यासाठीच तुम्हाला कामं करावी लागतात. तीही मनापासून! अर्थात हे मत आमचं नसून नगरसेविका अरुणा भालेकर यांनी हे मत व्यक्त केलं. त्या म्हणतात, आमच्या प्रभागात मी आणि नगरसेवक सुरेश म्हेत्रे असे आम्ही दोघे नगरसेवक मिळून अशी काही विकासकामं केली आहेत, की त्या कामांच्या जोरावरच पुढची निवडणूकही आम्हीच जिंकू आणि ते ही अपक्ष म्हणूनच!

केबी9 न्यूजवर आयोजित विकासकामांचा लेखाजोखा या मालिकेतील प्रभाग क्र. 2 (ब) च्या नगरसेविका अरुणा दिलीप भालेकर यांची मुलाखत झाली. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातली सरळमार्गी व्यक्ती तर समजलीच, पण प्रभागाला आपलं कुटुंब मानून, नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठीची त्यांची तळमळही जाणवली. कोणत्याही पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला तिकिट दिलं नसल्याची सल त्यांना आहेच; पण प्रभागातील नागरिकांनी केवळ त्यांच्या कामावर आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून नगरसेविका म्हणून निवडून दिल्याबद्दल त्या खूप समाधानी वाटल्या. लोकांसाठी काम करणं हे आमचं कर्तव्यच आहे, असे सांगून अरुणाताईंनी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली. त्यांच्या भालेकर घराण्याला सामाजिक कार्याची आणि राजकीय कार्याची मोठी परंपरा आहे. अरुणाताईंच्या सासूबाई आणि जाऊबाई या ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करीत होत्या. त्यामुळे आल्या-गेल्या नागरिकांशी आपलेपणानं वागण्याची समज आपोआपच आली. लोकांच्या अडचणी जवळून जाणून घेता आल्या. अरुणाताईंकडे कोणीही आपली अडचण घेऊन गेला की त्या त्याला रिकाम्या हाताने परत पाठवतच नाहीत. त्यांच्याकडून काही ना काही मदत त्या व्यक्तीला मिळणारच! यामुळेच की काय, अपक्ष असतानाही लोकांनी अरुणाताईंवर प्रचंड विश्वास ठेवला. 

नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर अरुणाताईंवरची जबाबदारी वाढली. पण त्यांच्याच प्रभागातले नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्याशी त्यांचा उत्तम समन्वय असल्यामुळे कामाचं वाटप, जबाबदार्‍यांचं वाटप काटेकोरपणे केलं. अरुणाताईंना काही अडचणी जाणवल्यास त्या म्हेत्रे यांचा सल्ला घेतात. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचाच फायदा झाला आहे. विकासकामं करताना आत्मविश्वासाने करता आली, असं अरुणाताई प्रांजळपणे कबूल करतात. नागरिकांना रस्ता, वीज, पाणी या मुलभूत सोयी पुरवतानाच अन्य सोयी-सुविधांकडेही लक्ष द्यावे लागले. या भागात रेड झोनचीच मुख्य समस्या आहे. त्यामुळे अनेक कामं करताना मर्यादा येतात. रेड झोनमुळे आरक्षणं ताब्यात घेता आली नसल्याची खंत अरुणाताईंना आहे. येथील रस्ते अतिशय अरुंद आहेत. गुंठा-दोन गुंठ्यांवर घरं बांधून नागरिक राहतात. रस्ते रुंद करायचे असतील तर घरं पाडावी लागणार. त्याबदल्यात लोकांना चांगला पैसा किंवा जमीन मिळण्याची अपेक्षा आहे. या सार्‍या त्रांगड्यामुळे विकासकामं हवी तशी होऊ शकत नाहीत. आमदार महेश लांडगे यांच्याकडे रेड झोनसंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. 

अरुणाताईंना महिलांसाठी खूप काम करायचंय. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून असणार्‍या विविध योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी त्यांची नेहमी धडपड सुरू असते. बचतगटांचं महत्त्वही त्या जाणून आहेत. त्यामुळेच प्रभागातील महिलांना बचतगटाद्वारे सबल करण्यासाठीही त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे विधवा-निराधार महिलांना आर्थिक मदत मिळवून देणं असो, महिलांना शिलाई मशिनचं वाटप करणं असो, गरीब व हुशार विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप असो, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप असो, अरुणाताई नेहमीच याबाबत पुढे असतात.  या सर्व कामात त्यांच्या कुटुंबियांचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळतोच, शिवाय प्रभागातील नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. येत्या वर्षात रेड झोन हटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या ठासून सांगतात. समन्वयानं प्रभागाचा विकास कसा होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण प्रभाग क्र. 2 मध्ये पाहायला मिळाला.  नागरिकांच्या मनात आपलं स्थान पक्कं करण्यासाठी इतरांनी त्यांचं अनुकरण करण्याची गरज नक्कीच आहे.