ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

काम, दर्जा आणि वेळेबाबत कधीच तडजोड केली नाही! - दत्तात्रय साने

प्रभाग क्र. ३ (ब) - चिखली

ठळक कामं - 
0 प्रभागात पिण्याच्या पाण्याची टाकी उभारली.
0 बचतगटांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण केलं. 
0 हुशार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली.
0 गरीब महिलांना शिलाई मशिनचं वाटप केलं.
0 प्रभागातील ड्रेनेजलाईन, जलवाहिन्या दुरुस्ती तसेच नव्याने टाकून दिल्या. 
0 महापालिकेची अद्ययावत शाळा सुरू केली. 

वर्षभरातील प्रस्तावित कामं -
0 डीपी रस्त्याची कामं पूर्ण करणार.
0 बीआरटी रस्त्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार.
0 संतपीठाची उभारणी करणार.
0 अद्ययावत ३५० खाटांच्या हॉस्पिटलची उभारणी सुरू.

पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी)- काही माणसं जन्मजातच लढवय्ये असतात. आपल्या हक्कांसाठी, लोकांच्या हक्कांसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, समाजातील अपप्रवृत्तींविरुद्ध ही माणसं सतत भांडत असतात. अर्थात हे भांडण अगदी सकारात्मकच असतं. लोकशाहीमार्गाने आपल्या हक्कांसाठी, आपल्या प्रभागासाठी लढणार्‍या काही मोजक्या नगरसेवकांपैकी एक म्हणजे प्रभाग क्र. ३ (ब) चे नगरसेवक दत्तात्रय बाबुराव साने उर्फ दत्ताकाका साने! दत्ताकाकांनी जेव्हापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला, ते एक लढवय्ये नेते म्हणूनच ओळखले जाऊ लागले. कारण प्रभागावर अन्याय होण्याविरुद्ध खुद्द तत्कालीन महापौरांच्या विरोधात काढलेला मोर्चा असो किंवा अनधिकृत बांधकामावरील कारवाईप्रसंगी स्वत: रस्त्यात उतरणं असो, अथवा प्लेग्राऊंडसाठी भांडून जागा घेणं असो, दत्ताकाका आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आणि अर्थातच लोकांसाठी केलेल्या या आंदोलनांमुळे लोकांच्या गळ्यातील ताईत बनले! काम, दर्जा आणि वेळ याबाबत कसलीही तडजोड न करणारे दत्ताकाका लोकांसाठीच काम करायचं ही आपल्या आई-वडिलांची शिकवण कधीच विसरले नाहीत, म्हणूनच त्यांच्या प्रभागातील विकासकामांचं श्रेयही आपसूक त्यांनाच जातं!

केबी9 न्यूजवर आयोजित विकासकामांचा लेखाजोखा या मालिकेतील आजची मुलाखत प्रभाग क्र. ३ (ब) चे नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या निवासस्थानी रंगली. अतिशय मोकळ्या वातावरणात दिलखुलासपणे झालेली ही बातचीत ऐकण्यासारखी होती. दत्ताकाकांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात सांगितली. घराण्यातच चालत आलेलं समाजकारण, त्यानंतर राजकारणातील प्रवेश, या क्षेत्रातील खेळी, चांगले-वाईट अनुभव अशा सर्वच बाबी त्यांनी खुलून सांगितल्या. १९९७ सालापासून दत्ताकाका राजकारणात आले. चिखली भागातील आरक्षण, १८ गावांना समाविष्ट न करणं, टॅक्स आदीबाबत अन्याय झाल्याची सल होतीच. त्यात २००४ साली मनपाकडून सादर झालेल्या विकास आराखड्यातही येथील अनेक गावांवर अन्याय झाला होता. आरक्षणाबाबत गोंधळाची परिस्थिती होती. त्याकाळात टॅक्सचा मोठा प्रश्‍न होता. पण आदरणीय नेते शरदजी पवार यांच्या माध्यमातून मी तब्बल ४९ कोटी रुपयांचं टॅक्स माफ करायला लावलं आणि इथूनच लोकांचा माझ्या कामावर विश्वास दृढ होऊ लागला. २००२ साली चिखली ते मोशी असा मोठा प्रभाग होता. मंगला कदम, शरद बोर्‍हाडे यांनी आपापल्या भागाचा विकास केला. पण आम्ही वंचित राहिलो. या अन्यायाच्या विरोधात आणि विकासकामांसाठी राष्ट्रवादीच्याच महापौर मंगला कदम यांच्याविरुद्ध मोर्चा नेणारा मी एकमेव नगरसेवक ठरलो. त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकाला एकाही बांधकामाला हात लावू दिला नाही. कारण लोकांनी पै-पै जमवून केलेलं बांधकाम मी स्वत: पाहिलं होतं. आरक्षण आणि इतर मुद्दे अथवा कोर्टाचा निर्णय मला मान्य आहे, पण लोकांवरती हा अन्यायही मी कसा सहन करणार होतो? त्यामुळे माझ्या या आक्रमक भूमिकेमुळे येथील एकही वीट काढू दिली नाही. माझ्या प्रभागातील समस्या या माझ्या वैयक्तिक समस्या समजत असल्यामुळे मी नेहमीच लोकांसाठी अर्ध्या रात्री मदतीला येईन, दत्ताकाका सांगत होते. 

मी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो. वारकरी संप्रदायाशी अतिशय जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोणताही स्वार्थ मनात न ठेवता मी लोकांसाठीच काम करावे, अशी आई-वडिलांची शिकवण होती. तिचं पालन आजही करतोय. नगरसेवक म्हणून माझी प्रभागातील कामं सुरूच आहेत. या भागात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्‍न होता. रात्री-अपरात्री केव्हाही पाणी यायचं. त्यामुळे माता-भगिनींचे मोठे हाल व्हायचे. यासाठी पाण्याची मोठी टाकी बांधली. तिचं उद्घाटन दोन महिन्यात होणार आहे.  मनपाची शाळा क्र. ९०, ९१ याच परिसरातली. पण वर शाळा, खाली कमर्शिअल बिल्डिंग असा अजब प्रकार इथे होता. तो थांबवून आता अद्ययावत सोयींनी सुसज्ज ५४ वर्गांची मोठी शाळा बांधली. येत्या जूनपासून येथील वर्गही सुरू होतील. गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची परवड थांबेल. तसेच प्रभागात चांगल्या दवाखान्याची वानवा होती. वायसीएमनंतर अतिशय सुसज्ज असे ३५० खाटांचे हॉस्पिटलही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज लाईन आणि अन्य विकासकामं केलेलीच आहेत. याशिवाय मनातली म्हणून काही कामं आहेत, जी लवकरच मार्गी लागतील. चिखली परिसराला सांप्रदायिक वारसा आहे. त्यामुळे इथे संतपीठाची निर्मिती करायची आहे, असं दत्ताकाका सांगतात. दत्ताकाकांची तळमळ पाहता ही कामही लवकरच पूर्णत्वास येतील, यात तीळमात्र शंका नाही!